उद्धव ठाकरेंनी नागपूरला लागलेला कलंक म्हटल्यावर देवेंद्र फडणवीसांचही ‘कडक’ प्रत्युत्तर, म्हणाले…

Ex CM Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Petrol Hike Issue

‘’तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर…’’असंही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना  सुनावलं आहे.

विशेष प्रतिनिधी

नागपूर : शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कालपासून  दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फूट पडल्यानंतर प्रथमच  उद्धव ठाकरे भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. दरम्यान, काल नागपूरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक असल्याची जहरी टीका केली. त्या टीकेला भाजपाकडूनही जोरदार प्रत्त्युत्तर दिले गेले तसेच खुद्द फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis gave a strong reply to Uddhav Thackerays criticism

देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले –

‘कलंकीचा काविळ’ !

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!

2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!

3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!

4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!

5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!

6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!

7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!

8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धव ठाकरे! अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या  टीकेला कडक प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? –

“देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे.” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका  केली होती.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis gave a strong reply to Uddhav Thackerays criticism

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात