महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या तीनही राज्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले आहेत. त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध किंवा इतर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.Delta Plus variant of Corona virus in three states including Maharashtra
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या तीनही राज्यांमध्ये करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले आहेत. त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध किंवा इतर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य विभागाने या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केले आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेचा जोर ओसरू लागलेला असताना दुसरीकडे देशातम्युकरमायकोसिसपाठोपाठ डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या विषाणूच्या या प्रकाराचे देशात फारसे रुग्ण जरी नसले, तरी त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहाता केंद्र सरकारने देशातील तीन राज्यांना तातडीने पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट भारतासह जगातल्या एकूण ८० देशांमध्ये सापडला आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोतुर्गाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे.
भारतात डेल्टा प्लसचे एकूण २२ रुग्ण सापडले आहेत. मात्र, या २२ पैकी १६ रुग्ण महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत. त्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत.अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेल्टा प्लस व्हेरिएंटविषयी महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव, केरळमधील पलक्कड आणि पथ्थनमथित्ता, मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तीनही राज्यांना सल्ला दिला आहे की स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाने या व्हेरिएंटविषयी अधिक लक्षपूर्वक आणि कार्यक्षमपणे काम करणे आवश्यक आहे.
आधीपासूनच या यंत्रणा व्यापक अर्थाने त्या पातळीवर काम करत असल्या, तरी डेल्टा प्लसबाबत अधित सतर्क राहण्याची गरज आहे.या ठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन, गर्दी कमी करणे आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी करणे,
व्यापक प्रमाणावर चाचण्या करणे, ट्रेसिंग वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकृत करणे अशा उपाययोजनांसंदर्भात राज्य सरकारांनी तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश केंद्राकडून या तीन राज्यांना देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App