विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा शिगेला पोचला असताना काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टी या तिन्ही पक्षांचे बडे नेते हिरीरीने मैदानात उतरलेत. पण त्या पलीकडे जाऊन दिल्ली दंगलीतले दोन आरोपी उमेदवार कोर्टाकडून जामीन मिळवून प्रचाराच्या मैदानात आल्याने आम आदमी पार्टीला राजकीय धोका उत्पन्न झाला आहे.
दिल्ली दंगलीतील आरोपी आणि आम आदमी पार्टीचा आधीचा नेता ताहीर हुसेन मुस्तफाबाद मध्ये, तर शफी उर रहमान ओख्ला मध्ये प्रचारात उतरला आहे. हे दोन्ही नेते आधी आम आदमी पार्टीमध्येच होते. परंतु आता ते असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. त्यांच्या उमेदवारीमुळे आणि प्रचारामुळे दिल्लीमध्ये मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये आम आदमी पार्टी अडचणीत आली.
Sanjay Raut : मुंबईत स्वबळावर, महाराष्ट्रात इतरत्र आघाडी, संजय राऊत न्यांचा फॉर्मुला
दिल्ली दंगलीच्या आरोपांची झळ आम आदमी पार्टीला बसू नये म्हणून अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या आधीच ताहीर हुसेन आणि शफी उर रहमान यांची पक्षातून हाकालपट्टी केली होती. त्यांना दंगलीच्या आरोपाखाली तुरुंगात राहावे लागले होते. परंतु, तरी देखील असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाने त्यांना मुस्तफाबाद आणि ओख्ला या दोन मतदारसंघांमधून उमेदवारी देऊन मैदानात उतरवले. त्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये वर्चस्व असलेल्या आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला.
पण तुरुंगात असल्यामुळे हे ताहीर हुसेन आणि शफी उर रहमान दोघेही प्रचारात उतरू शकले नव्हते, त्यामुळे आम आदमी पार्टीने प्रचारात आघाडी घेतली होती, पण कोर्टाकडून जामीन मिळवून ते दोघे आजच प्रचारात उतरले. ताहीर हुसेन याने मुस्तफाबाद मध्ये प्रचार रॅली काढली, तर शफी और रहमानने ओख्ला मध्ये प्रचार केला. इथून पुढे 5 दिवस ते प्रचारात असणार आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टीची मोठी अडचण झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App