पुढे अजित पवार म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी मोठे आदर्श आहेत.Defamation of the statue is an attack on the sentiments of the people and the identity of the nation – Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बंगळूरमध्ये काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की , अशा कुठल्याच घटनेने छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी जराही कमी होणार नाही, पण अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नसल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.या घटनेविषयी दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
पुढे अजित पवार म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी मोठे आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरू शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासीयांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला केल्यासारखा आहे.
या घटनेकडे कर्नाटक सरकार आणि केंद्र सरकारने गांभीर्याने पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App