गिटहबच्या एका अॅपवर मुस्लिम महिलांची बदनामी; नवाब मलिक, ओवैसी, प्रियांका चतुर्वेदी यांची कारवाईची मागणी, आयटी मंत्र्यांनी केला हा खुलासा

ऑनलाईन पोर्टल गिटहबवर अॅप तयार करून मुस्लिम महिलांची बदनामी करण्यात येत आहे. या संतापजनक प्रकरणावरून विविध राजकीय नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे. याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीने ओवैसी यांनी संताप व्यक्त केला असून शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनीही कारवाईची मागणी केली आहे. Defamation of Muslim women on a GitHub app; Nawab Malik, Owaisi, Priyanka Chaturvedi demanded action, the IT Minister revealed


प्रतिनिधी

मुंबई : ऑनलाईन पोर्टल गिटहबवर अॅप तयार करून मुस्लिम महिलांची बदनामी करण्यात येत आहे. या संतापजनक प्रकरणावरून विविध राजकीय नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे. याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीने ओवैसी यांनी संताप व्यक्त केला असून शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनीही कारवाईची मागणी केली आहे.

महिलांच फोटो विकृत करून परवानगीशिवाय केले जातात. हा मोठा गुन्हा आहे. यावर कडक कारवाई झाली नाही, तर हे सर्व असेच सुरू राहील, अशी प्रतिक्रिया ओवैसींनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक म्हणाले की, याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. याआधीही असे प्रकार घडले आहेत. यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मुलींना बदनाम करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणी मी पाठपुरावा करणार असल्याचे मलिक म्हणाले.

यात मुंबईतीलही काही मुली अडकल्याचे ते म्हणाले. मुलींबद्दल वादग्रस्त मजकूर लिहून त्यांचे फोटो शेअर करणे हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे याचा पाठपुरावा करुन दोषींना अटक करण्याची मागणी करणार असल्याचे मलिक म्हणाले. मलिकांनी तर असाही आरोप केला की, केंद्र सरकारचे समर्थक असे काही पोर्टल्स चालवत असून त्यांच्याकडून पाठराखण होत आहे. केंद्रीय यंत्रणांकडून जर दोषींवर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र पोलीस कारवाई करतील, असे इशाराही मलिकांनी दिला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या विकृत अॅपवरून सरकारला घेरले आहे. याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून, साइट ब्लॉक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत 30 जुलै आणि 6 सप्‍टेंबर रोजी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना पत्र लिहिले होते, ज्याचे उत्तर 2 नोव्‍हेंबरला मिळाले, असे त्यांनी सांगितले.

आयटी मंत्री वैष्णव यांची प्रतिक्रिया

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, GitHub ने त्यांना 1 जानेवारीला सकाळी कळवले आहे की, हा वापरकर्ता ब्लॉक करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आणि पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

महिलांची ऑनलाइन बदनामी

गिटहबवर अॅप तयार करून सोशल मीडियावर द्वेष पसरवला जात आहे. हे अॅप म्हणजे सोशल मीडियावर काही समाजकंटकांची नव्या प्रकारची गुंडगिरी आहे, येथे हे लोक त्यांच्या मानसिक विकृतीचे प्रदर्शन करतात. या अॅपवर मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात असून त्यांच्याविरोधात घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी सुल्ली सौदा अॅप आले त्याच धर्तीवर हे नवे अॅप आले आहे. हे दोन्ही अॅप गिटहबवर लाँच झाले होते.

गिटहब हा एक होस्टिंग प्लॅटफॉर्मवर आहे. या प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचे अॅप्स पाहायला मिळतील. GitHub एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असून वापरकर्त्यांना अॅप्स तयार आणि शेअर करण्यास अनुमती देतो. यासाठी तुम्हाला फक्त एका ई-मेल आयडीची गरज असते. या वादग्रस्त अॅपबाबत मुस्लिम महिलांच्या मानसिक छळाचे प्रकरण एका महिला पत्रकाराने ट्विटरवर शेअर केल्यावर समोर आले. ज्या लोकांनी हे अॅप विकसित केले आहे त्यांनी त्या अॅपवर या महिला पत्रकाराचा फोटो शेअर केला आहे आणि लोक या पत्रकारावर लैंगिक शेरेबाजी, घाणेरड्या कमेंट्स करत आहेत.

या महिला पत्रकाराने तिची व्यथा सांगितली की, “एक मुस्लिम महिला म्हणून तुम्हाला तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात या भीतीने आणि द्वेषाने करावी लागली हे खूप दुःखद आहे. अर्थात हे न म्हणता समजून घेतले पाहिजे की या नवीन आवृत्तीमध्ये फक्त मी एकटी नाही आणखी बऱ्याच जणींनाही हेच सहन करावं लागतंय.”

काय होते हे अॅपवर?

जेव्हा कोणी हे वादग्रस्त अॅप उघडते तेव्हा त्यांना रँडमली मुस्लिम महिलांचे फोटो दिसतात. एकदा वापरकर्त्याने अॅप उघडल्यानंतर, त्यांना मुस्लिम महिलेचा चेहरा दर्शवला जातो, त्यानंतर वापरकर्ता त्याला फोटो ऑफ द डे म्हणून ते दाखवतो. त्यानंतर या फोटोवर असभ्य कमेंट्स देऊन या अॅपवर बोली लावली जाते. त्यानंतर #BulliBai या हॅशटॅगने दिवसभर ट्रेंड केला जातो.

यावेळी अॅपवर ट्विटर आणि फेसबुकवर उपस्थिती असलेल्या 100 महिलांना लक्ष्य केले जात आहे. या घाणेरड्या प्लॅटफॉर्मवर त्यांची नावे आणि फोटो वापरले जात असल्याचे माध्यमांसह इतर क्षेत्रातील महिलांनी सांगितले आहे.

पत्रकाराची दिल्ली पोलिसांकडे तक्रार

महिला पत्रकाराचा फोटो सार्वजनिक झाल्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल शाखेत तक्रार दाखल केली आणि त्याचे एफआयआरमध्ये रूपांतर करण्याची मागणी केली. महिलेच्या तक्रारीला उत्तर देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी याची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

एकूणच, महिलांच्या बाबतीत हा संतापजनक प्रकार सुरू असल्याने सर्व स्तरांतून संतापाची लाट उसळली आहे. या अॅपच्या निर्मितीमागे असलेल्या विकृत मानसिकतेच्या लोकांना शोधून कठोर शिक्षा होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Defamation of Muslim women on a GitHub app; Nawab Malik, Owaisi, Priyanka Chaturvedi demanded action, the IT Minister revealed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात