विशेष प्रतिनिधी
नगर : माजी मंत्री, सहकार क्षेत्रातील नामवंत नेते शंकरराव कोल्हे यांचे १६ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्याच्या निधनाने सहकार, शेती, शिक्षण आणि कर प्रणाली या विषयाचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ४:३० वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. Death of Shankarrao Kolhe
१९८५ ते १९९० चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते. कोल्हे यांनी १९६० मध्ये सहकाराच्या माध्यमातून संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली.सहकाराच्या माध्यमातून त्यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत अनेक पायलट प्रकल्प दिले.
१९७२ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची उमेदवारी केली आणि कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व सुरु केले. १९८९ ते २००४ या काळात शंकरराव कोल्हे यांनी कोट्यवधी रुपयांचा शासकीय निमशासकीय निधी उपलब्ध करून असंख्य विकासाची कामे मार्गी लावली आहेत. त्यांनी सहा पंचवार्षिक विधिमंडळात कामकाज केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App