विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या पत्नी सायरा बानू यांचे सांत्वन केले. याबद्दल सायरा बानू यांनी पंतप्रधानांकडे कृतज्ञता व्यकत केली आहे.death of Dilip Kumar, Prime Minister Modi’s condolence phone call, Saira Bano, expressed her gratitude
बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांनी 7 जुलैला या जगाला निरोप दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
मोदी यांनी सकाळी बातमी मिळाल्यावर सायरा बानो यांना फोन करुन दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. त्याच वेळी आता सायरा बानो यांनी दिलीप साहब यांच्या मृत्यूबद्दल शोक व सांत्वन केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
दिलीपकुमार यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत सायरा बानो यांनी लिहिले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जी धन्यवाद, सकाळी फोन करून सांत्वन दिलं – सायरा बानो खान.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App