प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहिण हसीना पारकर तिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि दाऊद यांच्या संबंधाने मधली एक साखळीच पुढे आली आहे. Dawood ibrahim NCP Nexus hasina parkar
दहशतवादी याकूब मेमनचा वकील राष्ट्रवादीचे खासदार मजिद मेमन होते. त्यांनी यापूर्वी मला फाशी देऊ नये यासाठी जंग जंग पछाडले होते. दाऊदला मनी लॉन्ड्रिंग द्वारे पैसे पोहोचवणारे मंत्री राष्ट्रवादीचे नवाब मलिक आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससाठी दाऊद आणि दाऊद साठी राष्ट्रवादी काँग्रेस हे कामे करतात, हेच यातून स्पष्ट होत आहे, अशी टीका आता सोशल मीडियातून होऊ लागली आहे.
दहशतवादी याकूब मेमनचा वकील @NCPspeaks खासदार दाऊदला पैसे पोहोचवणारे मंत्री राष्ट्रवादीचे @nawabmalikncp म्हणजे राष्ट्रवादी दाऊदसाठी व दाऊद राष्ट्रवादीसाठी काम करतो? सत्ता मिळवण्यासाठी सोनिया सेना बनलेले सत्ता टिकविण्यासाठी दाऊद सेना होण्याच्या मार्गावर#NawabHataoDeshBachao https://t.co/EnUFRVH7iX — Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) March 9, 2022
दहशतवादी याकूब मेमनचा वकील @NCPspeaks खासदार
दाऊदला पैसे पोहोचवणारे मंत्री राष्ट्रवादीचे @nawabmalikncp
म्हणजे राष्ट्रवादी दाऊदसाठी व दाऊद राष्ट्रवादीसाठी काम करतो?
सत्ता मिळवण्यासाठी सोनिया सेना बनलेले सत्ता टिकविण्यासाठी दाऊद सेना होण्याच्या मार्गावर#NawabHataoDeshBachao https://t.co/EnUFRVH7iX
— Vijaya Rahatkar (मोदी जी का परिवार) (@VijayaRahatkar) March 9, 2022
या संदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजय रहाटकर यांनी एक ट्विट करून या संबंधांवर वेगळा प्रकाश टाकला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात सत्तेवर येऊन मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी शिवसेनेची आधी सोनिया सेना झाली आणि आता मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी सोनिया सेनेची दाऊद सेना झाली आहे, असे शरसंधान देखील रहाटकर यांनी या ट्विट मधून केले आहे. यामध्ये त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांना मंत्रिपदावर ठेवणे आणि त्यांना पाठीशी घालणे यातून हे सरकार दाऊदच्या पाठीशी उभे राहिल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App