प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना पारकर यांच्याशी असलेल्या कनेक्शन मधूनच नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केल्या आहेत.Dawood – Hasina Parkar Connection Bhovale; 8 properties of Nawab Malik confiscated
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांच्या मालमत्ता जप्त करून सर्वात मोठी कारवाई केली आहे. महिनाभरापूर्वीच ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या होत्या.
कुटुंबियांच्या नावावरील मालमत्ताही जप्त
ईडीने गोवावाला कंपाउंड त्याचबरोबर वांद्रे आणि कुर्ला परिसरातील मालमत्ता जप्त केली आहे. यात जमिनी आणि फ्लॅट्स आहेत. मंगळवारी, 12 एप्रिल रोजी इकबाल कासकरचा ठाण्यातील फ्लॅट ईडीने जप्त केला होता, आता ईडीने दाऊद कनेक्शनमध्ये अटकेत असलेल्या नवाब मलिकांच्या एकूण 8 मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईत नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने असलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि ईडीने त्यांच्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या मालमत्ता केल्या जप्त!!
कुर्ल्यातील गोवा वाला कंपाउंड : ही जमीन मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरकडून खरेदी केली होती, त्यातून त्यांचे दाऊद कनेक्शन समोर आले.
वर उल्लेख केलेल्या सर्व मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App