विशेष प्रतिनिधी
अमरावती : पंजाब, उत्तर प्रदेशातील बड्या शेतकऱयांबाबत कळवळा दाखविणाऱ्या जाणत्या राजाच्या राज्यात एक मुलीने घरच्यांवरील कर्ज आणि शिकायला, कपडे घायलाही पैसे नसल्याने आत्महत्या केली आहे.Daughter of a farmer commits suicide, the family was in deep loan, there is no money for education and clothes.
आपल्या सुसाईड नोटमध्ये सेजलने म्हटलंय, ‘मी आत्महत्या करणार आहे. माझ्या घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे. माझ्या घरात एकूण सहा जण आहोत. आई कामाला जाते. आमच्यावर खूप कर्च आहे. आम्हाला राहण्यासाठई जागा थोडी आहे. एक लहान भाऊ आहे. कर्ज काढून आई आम्हाला शिकवते.
आमच्या शेतात तीन वर्षे झाली खूप कमी उत्पन्न आले आहे. बाबाही खूप कष्ट करतात. मी कॉलेजमध्ये, बारावीत आहे. शिक्षणासाठी पैसे नाहीत. मी अनेक दिवसांपासून नैराश्येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मी आत्महत्या करत आहे.अमरावती जिल्ह्यातील 17 वर्षीय सेजलने आत्महत्या केली असून महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आणि मन सुन्न करणारी तिची सुसाईड नोट समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील छिंदवाडीत राहणारी 17 वर्षीय सेजल जाघव या तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की शेतात आई-बाबा कष्ट करतात मात्र, काहीही पिकत नाही. घर चालवण्यासाठी, शिक्षणासाठी कर्ज काढले आहे. शाळेत जाण्यासाठी कपडेही नाहीत. या सर्व परिस्थिती चिंताग्रस्त असलेल्या सेजलने आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी तिने लिहिलेली सुसाईड नोट समोर आली आहे.
आमच्या शेतात तीन वर्षे झाली खूप कमी उत्पन्न आले आहे. बाबाही खूप कष्ट करतात. मी कॉलेजमध्ये, बारावीत आहे. शिक्षणासाठी पैसे नाहीत. मी अनेक दिवसांपासून नैराश्येत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मी आत्महत्या करत आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App