प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात उरलेल्या नेत्यांची आणि शिवसैनिकांची रोज गळती होत आहे. त्यातले बहुतेक सगळेजण एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात येऊन मिळत आहेत. पण तरी देखील ठाकरे गटाचे नेते सरकार पडण्याचा मुहूर्त द्यायला चुकत नाहीत. Daily leakages from the Thackeray group, but the leaders give the time for the fall of the Shinde-Fadnavis government
शिवसेनेचे सर्वात ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तीकर यांनी परवाच बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून वसई, विरार, ठाणे, पालघर आदी भागातून शिवसैनिकांनी प्रवेश केला आहे. यात सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांचा देखील समावेश आहे. त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीकाटिपण्णी करून आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन काही रहस्य उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे.
असे असताना सुषमा अंधारे यांनी मात्र शिंदे फडणवीस सरकार येत्या तीन चार महिन्यांत कोसळेल, असे भाकीत केले आहे. शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता असल्याचा दावाही सुषमा अंधारे यांनी केला आहे. जर माझ्या विभक्त पतीने माझ्या विषयी काही जाहीररित्या सांगितले, तर मी देखील तयार आहे, असा इशारा सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
तुरुंगातून बाहेर आलेले शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी केलेले मध्यवर्ती निवडणुकांचे भाकीत खरे ठरेल, असा दावा केला आहे. शिंदे गटातले बहुसंख्य आमदार परत ठाकरे गटात परततील, असा दावा त्यांनीही केला आहे.
मात्र असे दावे होत असताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची गळती मात्र थांबायला तयार नाही. सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्या दाव्यावर शिंदेपटन मी सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिदावा केला आहे उद्धव ठाकरेंकडे उरलेल्या 16 आमदारांपैकी 12 ते 13 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App