सायरस पूनावालांनी तब्बल ७५० कोटींमध्ये खरेदी केलाय अलिशान महाल, मात्र आठ वर्षांपासून आहेत गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत!

Poonawala House

 जाणून घ्या नेमकं कारण काय? सरकारवर व्यक्त केली आहे नाराजी, म्हणाले…

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक डॉ. सायरस पूनावाला  हे मागील आठ वर्षांपासून आपल्या आलिशान घरात राहण्याची वाट पाहत आहेत. जे घर त्यांनी २०१५ मध्ये तब्बल ७५० कोटी रुपयांना विकत घेतले होते, त्या घरात त्यांना राहण्यास जाण्याची परवानगी आजपर्यंत मिळालेली नाही. आता या प्रकरणावर त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. Cyrus Poonawala has bought  House for as much as 750 crore but has been waiting for house entry for eight years

डॉ. सायरस पूनावाला यांनी २०१५ साली ७५० कोटींमध्ये अमेरिकेकडून मुंबईतील लिंकन हाऊस खरेदी केले होते. मात्र तेव्हापासून अद्यापपर्यंत त्यांना त्यांच्या या नवीन घरात राहायला जात आलेले नाही. यामुळेच पूनावाला यांनी केंद्र सरकार ‘राजकीय आणि समाजवादी दृष्टिकोन’ बाळगून घराचा ताबा देत नाही, असा आरोप ब्लुमबर्गशी बोलताना केला आहे. जमिनीच्या मालकीवरून वाद झाल्याने सरकारने त्या खरेदीला तात्पुरती स्थगिती दिली होती. या तात्पुरत्या स्थगितीमुळे  पूनावाला हे घराची संपूर्ण किंमत भरूनही त्या घरात राहण्यास जाऊ शकत नाहीत.

पूनावालांचे आरोप काय? –

सरकारच्या या बंदीवर नाराजी व्यक्त करत पूनावाला यांनी हा राजकीय निर्णय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, हा करार रोखण्यासाठी कोणताही आधार नाही. ब्लूमबर्गशी संवाद साधताना त्यांना सांगितले की, सरकराल नाही वाटत की या राजवाड्याची खरेदी व्हावी आणि यासाठी मोजण्याता आलेली भरमसाठ रक्क अमेरिकेकडे जावी. जमिनीचा खरा मालक कोण, हा वाद मिटलेला नाही. महाराष्ट्र सरकार आणि संरक्षण मंत्रालय दोन्ही या जमिनीवर दावा करत आहेत. तर दुसरीकडे अमेरिकाही याबाबत आपले दावे करत आहे.

भारतातील यूएस दूतावासाचे प्रवक्ते क्रिस्टोफर एल्म्स म्हणाले, “अमेरिकन सरकार मालमत्तेचे लीज हस्तांतरण पूर्ण करण्यासाठी समाधानकारक करार करण्यासाठी भारत सरकारसोबत काम करत आहे.

लिंकन हाऊस खास का आहे? –

मुंबईच्या ब्रीच कँडी भागात असलेले हे लिंकन हाऊस अतिशय खास आहे. दोन एकरात पसरलेले हे घर महालापेक्षा कमी नाही. जवळपास ५० वर्षे ही वास्तू अमेरिकन सरकारची मालमत्ता होती. लिंकन हाऊस हे दीर्घकाळ अमेरिकेचे वाणिज्य दूतावास होते. २०१५ मध्ये, सायरस पूनावाला यांनी १२० दशलक्ष डॉलर्समध्ये ते विकत घेतले. २०१५ मध्ये एका अमेरिकन डॉलरची किंमत ६४-६५ रुपये होती. त्यानुसार गणना केल्यास लिंकन हाऊसची किंमत भारतीय चलनात ७५० कोटी रुपये होती. आज या घराची किंमत ९८७ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सायरस पूनावाला यांनी ७५० कोटींहून अधिक रक्कम भरली होती.

लिंकन हाऊसची गोष्ट –

जर आपण त्याच्या इतिहासाबद्दल बोललो तर १९३८ मध्ये वांकानेरच्या महाराजांनी लिंकन हाऊस बांधले. सन १९५७ मध्ये ते अमेरिकन सरकारने भाडेतत्वावर घेतले होते. अमेरिकेने तेथे आपले वाणिज्य दूतावास उघडले, परंतु नंतर त्यांचे दूतावास स्थलांतरित झाले, त्यानंतर त्यांनी लिंकन हाऊस विकण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये सायरस पूनावाला यांनी ते अमेरिकेकडून ७५० कोटींना विकत घेतले होते, मात्र आतापर्यंत ते या घरात राहण्याची वाट पाहत आहेत.

Cyrus Poonawala has bought  House for as much as 750 crore but has been waiting for house entry for eight years

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात