वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात बॉलिवूड अभिनेता किंग खान याचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्लिन चिट दिली आहे. तसेच या प्रकरणात आर्यन खानसह ६ जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे. तसेच एनसीबीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खानचे नाव घेतले नसल्याचे सांगितले जात आहे. आर्यन खानकडे कोणतेही अंमली पदार्थ आढळले नाहीत. त्यामुळे एनसीबीनेच त्याला क्लिनचिट दिली आहे. Cruise Drugs Case: NCB’s clean chit to 6 people including Aryan Khan
कॉर्डिलिया क्रूझवर केलेल्या कारवाईत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कारवाई करून आर्यन खानसह १४ जणांना ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर या गुन्ह्याचा तपासासाठी एनसीबीने विशेष तपास पथक गठीत करून या गुन्ह्याचा तपास पुन्हा सुरू केला होता.
डायरेक्ट संजय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू होता. विशेष पथकाच्या तपासात आर्यन खानसह सहा जणांकडे ड्रग्स सापडले नसल्याचे उघडकीस आले असून १४ जणांपैकी या ६ जणांना या प्रकरणात एनसीबने क्लीन चिट दिली आहे. आर्यन खानसह ६ जणांविरुद्ध दाखल केलेला गुन्ह्यातून या ६ जणांचे नावे वगळण्यात आली असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App