विशेष प्रतिनिधी
पुणे : बाळूमामांचा अवतार असल्याची बतावणी करत भोंदू साम्राज्य उभे करणारा मनोहरमामा भोसले पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. कॅन्सर झालेल्या रुग्णास बरा करतो,असे सांगुन बारामतीतील एकाची अडीच लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Crime against Manohar Mama Bhosale for pretending to be the incarnation of Balumama,
शशीकांत खरात यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. खरात यांच्या वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे.त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले भोंदुबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजूबावी( ता बारामती जि पुणे )मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला.
वडीलांचा गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले.तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २,५१,५०० रुपये त्यांचे व त्यांचे वडीलांचे जिवाचे बरे वाईट होईल अशी भिती घालून देण्यास भाग पाडले.
पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मनोहरमामा भोसले यांच्यासह तीन जणांवर भारतीय दंड विधान, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटण कायदा व औषधे व चमत्कारी उपाय (अक्षेपार्ह जाहीरात) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून मनोहर मामा भोसले व त्याचे साथीदारांनी कोणाची फसवणुक वा भिती घालून पैसे देण्यास भाग पाडले असेल ,त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App