वृत्तसंस्था
मुंबई : देशात लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. या मोहिमेची नोंदणी प्रक्रिया बुधवारी (ता. 28 ) सुरु झाली असून 1 कोटींहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली आहे.18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. Cowin Registration: More than 1 crore citizens registered for vaccination on the first day
नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोविन पोर्टलवर अडचणी आल्या. मात्र नंतर (http://cowin.gov.in), आरोग्य सेतु आणि उमंग अॅप वर रजिस्ट्रेशन व्यवस्थित सुरु झालं. रात्री आठ वाजेपर्यंत एकूण 79 लाख 65 हजार 720 लोकांनी लसीसाठी नोंदणी केली होती.
MyGovIndia च्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “महामारी संपवण्याच्या दिशेने टाकलेलं लसीकरण हे महत्त्वाचं पाऊल आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेसाठी एक कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.”
दरम्यान,1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी परवानगी आहे. बुधवारी यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर Cowin आणि Aarogya Setu अॅप क्रॅश झाल्याच्या तक्रारी लोकांकडून झाल्या होत्या. पण, नंतर नोंदणी प्रक्रिया सुरु झाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App