कोविड सेंटर घोटाळा : ठाकरे – राऊतांच्या निकटवर्तीयांवर मुंबईत 10 ठिकाणी ईडीचे छापे!!


प्रतिनिधी

मुंबई :  कोरोना काळात मुंबईत कोविड सेंटर उभारण्यातील घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने 10 पेक्षा अधिक ठिकाणी छापे घातले आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण, सनदी अधिकारी संजीव जयस्वाल, संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर, संजय शहा यांच्या आणि कार्यालयांचा समावेश आहे.Covid center scam ED raids 10 places in Mumbai on Thackeray-Raut close relatives!

कोरोना काळात कोविड सेंटर उभारणे तसेच त्यासाठी साहित्य खरेदी करणे यामध्ये घोटाळा केलाचा आरोप या सर्वांवर आहे ज्या कंपन्यांकडून कोविड सेंटर उभारणी आणि साहित्य खरेदी झाली त्यांच्याकडून वल उल्लेख केलेल्या सर्वांनी विशिष्ट लाभ मिळवल्याचे आरोप आहेत.



सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानाबाहेर माध्यमांनी गर्दी केली असता तिथे ईडीच्या अधिकाऱ्यांसह इतरही काही मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. बुधवारी सकाळच्या सुमारास ईडीचे एक पथक इथ दाखल झालंमे. मुंबई महापालिकेलीत भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहारांची कारणे देत हे छापे घातल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

सदर प्रकरणामध्ये सुजित पाटकर यांचंही नाव गोवलं गेल्याचं कळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि प्रविण दरेकर यांनी या घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिली. लाइफलाइन हॉस्पिटलच्या माध्यमातून संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्यावर ईडीने छापे घातले आहेत. त्यांना हिशोब तर द्यावाच लागेल, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले, तर जे जे कोविड सेंटर आणि महापालिकेच्या वतीने घोटाळा झाला आहे त्यासंदर्भात ही कारवाई होत आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कोविड काळात प्रचंड खर्च झाला. त्याच संदर्भात ही चौकशी होत असावी, असे वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले.

उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपांनंतर ED अॅक्शन मोडमध्ये? 

19 जून 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख करत तब्बल 12500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता. यावेळी त्यांनी तत्कालिन महाविकास आघाडीच्या ठाकरे पवार सरकारवर ताशेरे ओढत हे घोटाळेबाज सरकार होते. एसआयटी चौकशीत आता सगळे नागडे होतील, अशा शब्दांत तोफही डागली होती.

कॅगच्या अहवालासून या कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती उघड झाल्याच्या वृत्ताला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुजोरा दिला होता. त्याच्या पुढील चौकशीसाठी सरकारने मुंबई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन केली आहे.

Covid center scam ED raids 10 places in Mumbai on Thackeray-Raut close relatives!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात