विशेष प्रतिनिधी
मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेवर २० सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले. Court gave relief to Poonam and Sahrlin
राज कुंद्राने सिनेमात काम करण्यासाठी दबाव आणला होता, असा दावा दोघींनी केला आहे. चोप्राने याबाबत सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये पोलिसांना माहिती दिली होती, असे शर्लिनने यापूर्वी म्हटले आहे; तर पूनम पांडेने सर्वांत आधी २०१९ मध्ये कुंद्राविरोधात पोलिस तक्रार केली होती आणि उच्च न्यायालयात याचिकाही केली होती असे म्हटले आहे.
गुन्हे शाखेने दोघींना चौकशीसाठी समन्स बजावले होते; मात्र यात अटक होण्याच्या भीतीने दोघींनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दोघींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. चित्रीकरणात सहभागी झाल्याचा आणि कंटेन्ट दिल्याचा तपास पोलिस करत आहेत. यापूर्वी पोलिसांच्या सायबर विभागाने चोप्राविरोधात अन्य एका प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तिला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App