विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील दोन आमदारांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. हिवाळी अधिवेशनामुळे अनेक मंत्री, आमदार, नेते यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होत आहे. Corona to two other MLAs from the state, Invitation to infection due to winter session
आमदार निलय नाईक हे नागपूर येथील खासगी रूग्णालयात तर पुसद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक हे मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याची लक्षणे दिसत आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आमदार, मंत्री आणि नेते मंडळींनाही कोरोना होत आहे. हिवाळी अधिवेशनातून कोरोनाचा प्रसार झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. दोन्ही आमदारांची प्रकृती ठिक आहे. या आमदारांनी कोरोनाची टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोविड टेस्ट करून घ्यावी असे आवाहन आमदार निलय नाईक यांनी केले.
दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. पंकजा यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. महाराष्ट्रातील १० मंत्री आणि २० पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App