महाराष्ट्रातील ३६६ आमदारांची आणखी चांदी, विकास निधीत घसघशीत वाढ होणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटीची वाढ करण्यात आली आहे. आमदारांना दरवर्षी स्थानिक विकास निधीअंतर्गत आता तीन कोटी रुपये मिळणार आहेत. गेली दहा वर्ष प्रत्येक आमदारास दोन कोटी रुपयांचा विकास निधी मिळत होता. Maharashtra MLAs get additional one cr

राज्य विधिमंडळात विधान परिषदेचे 78 आणि विधानसभेचे 288 असे राज्यात एकूण ३६६ आमदार आहेत. त्यांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 2 कोटी रुपये निधी दिला जात होता. अलिकडच्या काळात बांधकाम साहित्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विकास निधीत वाढ करण्याची मागणी आमदार सातत्याने करत होते. वर्ष 2020-21च्या अर्थसंकल्पात आमदार निधीत एक कोटी वाढ करण्याची घोषणा झाली होती; मात्र तो वाढीव निधी प्राप्त झाला नव्हता.या निधीतील 30 टक्के निधी पूर्वी झालेल्या विकास कामांच्या देखभालीवर खर्च करण्यात येणार आहे. तसेच त्यातील 10 टक्के निधी राज्य शासनाच्या इतर योजेनेतून उभ्या राहिलेल्या वास्तूंच्या देखभालीवर तातडीची बाब म्हणून खर्च करण्यात येणार आहे.

मंगळवारी (ता. 23) नियोजन विभागाने त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला. 2020-21पासून प्रत्येक आमदाराला दरवर्षी 3 कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त होण्यास मंजूरी देण्यात येत असल्याचे या निर्णयात म्हटले आहे.

Maharashtra MLAs get additional one cr

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*