राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मुंबईत गेल्या ४८ तासांत कोरोनामुळे २ पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील नागपाडमध्ये मोटार वाहन विभागाच्या उपनिरीक्षकाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. महेंद्र भाटी असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. महेंद्र भाटी हे मुंबई पोलिसांच्या मोटार वाहतूक विभागात कार्यरत होते. शनिवारी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 125 मुंबई पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. Corona strikes Mumbai police, 2 deaths in 48 hours, 523 infected in last 8 days
वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मुंबईत गेल्या ४८ तासांत कोरोनामुळे २ पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील नागपाडमध्ये मोटार वाहन विभागाच्या उपनिरीक्षकाला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. महेंद्र भाटी असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. महेंद्र भाटी हे मुंबई पोलिसांच्या मोटार वाहतूक विभागात कार्यरत होते. शनिवारी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 125 मुंबई पोलिसांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महेंद्र भाटी हे वरिष्ठ एमव्ही विभागासाठी ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते आणि ते गोरेगावमधील पोलिस कॅम्पमध्ये राहत होते. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांनी छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. भाटी हे यावर्षी ३० एप्रिल रोजी पोलीस दलातून निवृत्त होणार होते.
मुंबई पोलिसांत गेल्या 8 दिवसांत 523 पोलिसांना लागण झाली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचवेळी, गेल्या 24 तासांत मुंबई पोलिसांच्या 161 कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. यापैकी 34 पोलिस कर्मचारी आहेत ज्यांना एकापेक्षा जास्त वेळा संसर्ग झाला आहे. मुंबई पोलिसांचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App