राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाने गाठले

प्रतिनिधी

मुंबई – कोविड काळात मास्क न लावणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेर कोरोनाने गाठल्याची बातमी आहे. राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा आणि स्वतः राज ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. अर्थात या दोघांना सौम्य लक्षणे आहेत. तर त्यांच्या सहायकालाही महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.Corona reached out to Raj Thackeray and his mother

राज ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे त्यांचे मुंबईसह इतर ठिकाणचे दौरे रद्द झाले होते. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.



राज ठाकरे हे घरीच असून त्यांच्या आईला लीलावती रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांच्या सहायकाला विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने याला पुष्टी दिली आहे.

राज ठाकरे हे पहिल्या दिवसापासून मास्क लावत नव्हते. जेव्हा पहिल्या लाटेच्या वेळी ते सर्व पक्षीय बैठकीला न मास्क लावता मंत्रालयात गेले,आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारील खुर्ची होती.

दुसऱ्या टप्प्यात नाशिकचे माजी महापौर मुर्तडक याना मास्क काढायला लावले होते. असे राज ठाकरे यांचे कोरोना काळातील अनेक किस्से आहेत. त्या राज ठाकरे यांना अखेर कोरोनाने गाठले आहे.

Corona reached out to Raj Thackeray and his mother

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात