विशेष प्रतिनिधी
मुंबई – राज्यात कोरोनाच्या रुग्णांपैकी ३२ हजार २५० जण वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल आहेत. त्यापैकी १३.७२ टक्के रुग्ण गंभीर आहेत. राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के असून मृतांचा आकडा एक लाख ३३ हजार ७१७ वर पोहोचला आहे.Corona patients will increasing once again
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक गंभीर रुग्ण आहेत. एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी २० हजार ४३७ (६३.३७ टक्के) लक्षणविरहित, सौम्य लक्षणांसहित आहेत, तर सात हजार ३८९ (२२.९१ टक्के) रुग्ण अतिदक्षता विभागातून बाहेर आले आहेत. मात्र, ते ऑक्सिजनवर आहेत.
गंभीर रुग्ण अधिक असल्याने मृत्यूही मोठ्या संख्येने होत आहेत. औरंगाबाद , कोल्हापूर आणि पुणे मंडळात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. नागपूर मंडळात मृत्यू नियंत्रणात आले आहेत. पुण्यासह ठाणे शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या अधिक आहे.सध्या ७४ हजार ९९५ सक्रिय रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३२ हजार २५० रुग्ण प्रत्यक्षात रुग्णालयांत आहेत. त्यातील चार हजार ४२४ रुग्ण गंभीर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App