विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुंबईत आठवडाभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आठवडाभरात सक्रिय रुग्णांची संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. मुंबईप्रमाणेच राज्यातील सक्रिय रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढले आहेत.Corona increasing in Maharashtra once again
तीन आठवड्यांपूर्वी सहा डिसेंबरला राज्यात ६,२०० सक्रिय रुग्ण होते, आता तीच संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे.त्यामुळे पुढील दोन ते तीन आठवडे महत्त्वाचे असून काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
आठवडाभरापासून मुंबईत कोरोनाने पुन्हा हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. आठवडाभरापूर्वी २०० ते ३०० दरम्यान असणारी दैनंदिन रुग्णसंख्या आता ८०० ते ९०० पर्यंत वाढली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
एक हजारांपर्यंत कमी झालेली मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आता चार हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या जे रुग्ण आढळत आहेत, त्यातील ९० टक्के रुग्ण डेल्टा, तर १० टक्के ओमिक्रॉनचे आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन ते तीन आठवडे काळजीपूर्वक निरीक्षण करण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App