वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्ण कमी होण्याचे प्रमाण ९७.६ टक्के आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी ६६१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ८९६ जण रोगमुक्त झाले आहेत. १० जणांचा मृत्यू झाला आहे.Corona cure rate in the state is 97.6 percent 661 people injured on Saturday; 896 people cured
चौदा हजारांवर रुग्ण ॲक्टिव्ह
राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५८,०४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१६,७६२ आहे. शनिवार अखेर १४०३७२ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या मृत्यूदर २.१२ टक्के आहे.
तपासलेल्या ६,३१,७५,०५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१६,७६२ (१०.४७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. सध्या १,४८,८८० जण होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. १४,७१४ ॲक्टिव्ह रुग्ण राज्यात आहेत.
दक्षता आणि लसीकरण हाच उपाय
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना हा संपलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. अमेरिका आणि युरोपीय देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे.
जास्तीत जास्त लसीकरण करून घेतले पाहिजे. सामाजिक अंतर, मास्कचा वापर आणि सॅनिटायझेशन सुरू ठेवल पाहिजे. राज्याती रुग्ण संख्या पाहता ही खबरदारी घेतली पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App