प्रतिनिधी
मुंबई : तुमचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान करतात. सावरकरांचा अवमान करणे हा देशद्रोहच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान हा देशाचाच अपमान आहे आणि तो आम्ही सहन करणार नाही, अशा कठोर शब्दात शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात काँग्रेस – राष्ट्रवादीचा समाचार घेतला.Contempt of Veer Savarkar is treason; Chief Minister Eknath Shinde was tough in the assembly
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना भाजपा – शिवसेनेच्या आमदारांनी गुरुवारी जोडे मारले. त्यावर विधिमंडळाच्या परिसरात अशी कृती योग्य नाही, असा आक्षेप घेत काँग्रेस – राष्ट्रवादीने शुक्रवारी विधानसभा सभागृहात गदारोळ केला. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्यामुळे सभागृहाचे कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात हस्तक्षेप करीत काँग्रेस – राष्ट्रवादीचा कठोर शब्दांत समाचार घेतला. शिंदे म्हणाले, नाना पटोले तुम्हाला एकाच सांगतो, जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा आपल्याकडे तीन बोटं असतात. त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य प्रत्येकाने जपले पाहिजे. सावरकरांचा वारंवार अपमान करणे हे देशद्रोहाचेच काम आहे.
आम्ही बोलत नाही, याचा अर्थ आम्ही बोलू शकत नाही, असा घेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव जगभरात पोहोचवले. त्यांच्याविषयी तुम्ही अवमानकारक बोलता. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम ज्यांच्या नसानसात भिनली आहे, त्यांच्याविषयी तुमचा नेता असे वक्तव्य करतो. आमच्या लोकांचे फोटो, पोस्टर झळकावत नको नको ते बोलले गेले. गद्दार, खोके घेतले म्हणून हिणवले गेले, ते तुम्हाला चालले का? कारवाई व्हायची असेल, तर याचाही विचार करायला हवा. त्या सर्वांवरही कारवाई झाली पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
https://youtu.be/tJi73zmaao4
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App