विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसने धुडकावला 85 चा फॉर्मुला, 100 + जागा लढवू, असे म्हणत विजय वडेट्टीवारांनी पवारांना दिला दणका!! शरद पवारांनी पिल्लू सोडून दिलेल्या 85 फॉर्मुल्यातल्या गोची काँग्रेसच्या लक्षात आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी त्याला पूर्ण विरोध केला. विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज फुल्ल बॅटिंग करत 85 फॉर्म्युलातली हवा काढली.
विजय वडेट्टीवार म्हणाले :
काँग्रेसची दुसरी यादी तयार आहे. ती आज सायंकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर होईल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोणताही तिढा नाही. कारण आम्ही जेवण झाल्यानंतर जो विडा खाल्ला जातो, तो तिघांनी विडा खाल्ला आहे.
काँग्रेस 100 पेक्षा जास्त जागाच लढवेल. कारण आम्ही ती यादीच पक्षश्रेष्ठींना दिली आहे. जागावाटपात थोडीफार नाराजी झाली. पण 10 एकर जागा होती, ती 2 भावांमध्ये मिळून 5 – 5 एकर मिळणार होती, पण आता 3 भाऊ झालेत. त्यामुळे एकाला 4 एकर जागा मिळेल. दुसऱ्या दोघांना 3 – 3 एकर जागा मिळेल. काँग्रेस 100 + जागांवर निवडणूक लढवेल.
Congress : राजस्थानमध्ये काँग्रेसची दोन पक्षांसोबतची युती संपुष्टात!
शरद पवारांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना 85 च्या खोड्यात अडकवले. संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले ज्यावेळी सिल्वर ओक वर जाऊन पवारांना भेटले होते, त्यावेळी पवारांनी त्यांना आपले प्रत्येकी 85 जागांवर लढायचे निश्चित झाले आहे, ते तुम्ही जाहीर करून टाका आणि उरलेल्या जागा मित्र पक्षांबरोबर वाटून घेऊ, असे सांगा, असा सल्ला दिला होता. त्यामुळे या सगळ्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन 85 चा फॉर्म्युला जाहीर केला, पण त्यात नानांनी बेरीज चुकवली. 85 + 85 + 85 = 255 होत असताना ती 270 सांगितली. त्यामुळे महाविकास आघाडी सगळीकडूनच अडचणीत आली. तिच्यावर टीकेची झोड उठली. महायुतीतल्या नेत्यांनी नेत्यांना चिमटे काढायचे संधी मिळाली.
पण काँग्रेसच्या चलाख नेत्यांनी पवारांच्या 85 फॉर्मुल्यातली “मेख” ओळखली आणि त्यांनी त्याच रात्री तो फॉर्म्युला धुडकवायला सुरुवात करून आता 100 जागा पेक्षा जास्त जागांची मागणी रेटून धरली आहे. आज तर जमीन वाटपाचा 4 – 3 – 3 फॉर्म्युला सांगून वडेट्टीवार यांनी पवारांचा 85 चा फॉर्म्युला उघडपणे फेटाळून लावला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App