विशेष प्रतिनिधी
मुंबई : आधी शिवानी वडेट्टीवार आणि आता आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यांमधून सावरकरांचा पुन्हा एकदा अपमान झाला आहे. हा काँग्रेसचा प्लॅन बी तर नाही ना??, अशी शंका महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.Congress plan B of insulting Veer Savarkar
काँग्रेस हा असा पक्ष आहे, ज्याच्याकडून देशभरातल्याच नव्हे, तर जगभरातल्या राजकीय पक्षांनी राजकीय चिकाटी शिकावी. किंबहुना हेकेखोरी शिकावी. काँग्रेसने एखादा मुद्दा हातात घेतला आणि तो जरी फसला तरी त्यावर काँग्रेस काही काळ बॅकफूटवर जाते. पण प्लॅन बी द्वारे पुन्हा फ्रंटफूटवर खेळण्याचा प्रयत्न करतेच करते, असा आजवरचा अनुभव आहे!!
इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. त्यानंतर त्यांचा पराभव झाला. तरी देखील काँग्रेस नेते आणीबाणी लादण्याच्या निर्णयावर फारसे कधी बॅकफूटवर जात नाहीत. उलट वेगवेगळ्या मार्गांनी ते आणीबाणीचे समर्थनच करत राहतात.
असेच आता राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्यानंतर होत आहे. आपण सावरकर नाही, गांधी आहोत आणि गांधी कधी माफी मागत नाही, असे उद्गार राहुल गांधींनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत काढल्यानंतर महाराष्ट्रासह देशात जो राजकीय गदारोळ उठला. शिवसेना – भाजप युतीने आक्रमक होत सावरकर गौरव यात्रा काढली आणि त्या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद एवढा मोठा होता की त्यातून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी राजकीय धडा घेत राहुल गांधींना राजकीय दृष्ट्या बॅकफूट वर पाठवले. सावरकर मुद्दा अनावश्यक रित्या उकरून काढू नका, असा सल्ला शरद पवारांनी 18 पक्षांच्या बैठकीमध्ये दिल्यानंतर राहुल गांधी आणि सोनिया गांधी “गप्प” राहिले.
पण म्हणून त्यांनी सावरकर मुद्दा बासनात गुंडाळून ठेवला नाही, तर उलट सावरकरांवर वेगळ्या मार्गाने काही हल्ला करता येईल का??, याचा प्लॅन बी काँग्रेसने तयार केला. कारण राहुल गांधी यांना सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर जावे लागले ना, हरकत नाही, मग त्यांच्यापेक्षा कनिष्ठ स्तराच्या नेत्यांकरवी, त्यातही महिला ओबीसी दलित नेत्यांकरवी सावरकरांवर हल्लाबोल करण्यात येत आहे.
आधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात सावरकरांच्या “सहा सोनेरी पाने” या पुस्तकावरून त्यांच्यावर हल्लाबोल केला आणि आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सावरकरांवर त्याच पुस्तकावरून हल्लाबोल केला आहे. यातला “कॉमन फॅक्टर” लक्षात घेतला, तर या दोघी महिला ओबीसी – दलित नेत्या आहेत आणि त्यांनी “सहा सोनेरी पाने” या पुस्तकातला संदर्भ तोडून मरोडून का होईना पण अशा पद्धतीने पेश केला आहे, की ज्यामुळे सावरकर गौरव यात्रेनिमित्त महाराष्ट्रात जी राजकीय जागृती झाली, त्यातून शिवसेना – भाजपच्या जवळ गेलेला बहुजन वर्ग त्यांच्यापासून दूर व्हावा आणि तो पुन्हा काँग्रेसकडे वळावा. शिवसेना भाजपने काढलेला सावरकर गौरव यात्रेचा महाराष्ट्रात तयार झालेला राजकीय इफेक्ट धुवून काढण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
अर्थातच हा प्रयत्न यशस्वी होण्याविषयी शंका असल्याने काँग्रेसचे महाराष्ट्रातले पहिल्या फळीतले नेते सावरकर मुद्द्यावर सध्या गप्प आहेत. त्या ऐवजी महिला नेत्यांना पुढे करून त्यातही ओबीसी दलित महिला नेत्यांना पुढे करून सावरकरांवर हल्लाबोल करून महाराष्ट्रातल्या नव्या वातावरणातले राजकीय पाणी जोखून पाहिले जात आहे आणि हाच नेमका काँग्रेसचा प्लॅन बी आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App