विशेष प्रतिनिधी
मुंबई : Congress महाविकास आघाडीत शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची मर्यादा लक्षात घेऊन काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 85 चा खोडा टाकला, पण काँग्रेस नेत्यांनी त्यांची चलाखी वेळीच ओळखून 100 ची गुगली टाकून त्या खोड्यातून स्वतःचा पाय सोडवून घेतला.Congress
विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस 100 पेक्षा जास्त जागा लढवेल. तशी यादीच हायकमांडला दिली आहे, असे सांगून पवारांचा 85 चा फॉर्मुला धुडकावून लावला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात दिल्लीत आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यामध्ये 90 पेक्षा अधिक जागांवर काँग्रेसने निर्णय घेतला, असे त्यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. त्यामुळे 85 चा फॉर्म्युला 90 पर्यंत येऊन पोहोचला. टप्प्याटप्प्याने तो 100 पर्यंत नेऊन काँग्रेस ट्रिपल डिजिट जागा लढवेल, असे चित्र यातून निर्माण झाले.
ठाकरे आणि पवारांचा वरचष्मा जागावाटपाच्या वाटाघाटीत सहन करायचा नाही असा “पण” महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी केला असून तो काँग्रेस हायकमांडच्या गळी उतरवण्यात सध्या तरी त्यांना यश आल्याचे दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App