प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी आपण धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष असल्याचा दावा करत असतात. पण औरंगाबादचे एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दोन्ही पक्षांचा दावा खोडून काढला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी फक्त मुसलमानांची मते घेतली. त्यांना कायम खालची पदे दिली. ते कसले धर्मनिरपेक्ष पक्ष??, असा खोचक सवाल करून इम्तियाज जलील यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर शरसंधान साधले आहे. Congress-NCP is a secular party
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्षतेला मानणारा पक्ष असल्याचा दावा केला आहे. राजेश टोपे यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना इम्तियाज जलील यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर जोरदार शरसंधान साधले. इम्तियाज जलील म्हणाले, की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी फक्त मुसलमानांची मते घेतली. त्यांना कायम खालची पदे दिली.
मुस्लिम उमेदवारांना पंचायत समित्या, जिल्हा परिषद यांची तिकिटे दिली. पण आमदार – खासदार मात्र यांचे बाप आणि मुलगे झाले. त्या पक्षांनी जर आमदार – खासदारकीची तिकिटे मुस्लिम उमेदवारांना दिली असती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचे आम्ही मान्य केले असते. पण या दोन्ही पक्षांनी तसे केले नाही, असा टोला इम्तियाज झाली यांनी लगावला आहे.
एआयएमआयएम पक्षाने मुसलमानांची स्थिती बदलल्याचा दावा करून इम्तियाज जलील म्हणाले, की आमच्या पक्षाने मुस्लिमांची स्थिती एवढी बदलली आहे, की आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आका शरद पवार यांच्या मागे किंवा खाली बसत नाही, तर संसदेत त्यांच्या बरोबरीने बसतो. एवढी ताकद आज आम्ही कमावले आहे, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.
इम्तियाज जलील यांच्या या टोलेबाजीवर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. पण त्या पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात याची आता उत्सुकता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App