कसबा – चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंचा पत्रप्रपंच, मुख्यमंत्र्यांची फोन डिप्लोमासी


प्रतिनिधी

मुंबई : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना – भाजप आघाडीतले नेते ऍक्टिव्ह झाले असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी फोन डिप्लोमसी केली आहे. Kasba, chinchwad Byelection : CM eknath shinde called MVA leaders, raj Thackeray writes a letter to hold election unopposed

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना स्वतः फोन करून कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केलेला नाही पण येत्या दोनच दिवसात ते फोन करू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे

त्याचवेळी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांना एक पत्र पाठवून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची आठवण करून देत शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या विरोधात कोणी उमेदवार उभा केला नव्हता, याची आठवण करून दिली आहे. मतदारसंघाचा कौल हा 5 वर्षांसाठी विशिष्ट उमेदवाराला असतो.

त्याचबरोबर तो त्याच्या राजकीय पक्षाला देखील असतो. जर विजयी उमेदवाराचे निधन झाले, तर कदाचित उमेदवार त्याच्या घरातला असू शकतो किंवा त्या पक्षाचा असू शकतो. अशावेळी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दाखवून निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा आहे. ही प्रथा अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत पाळली गेली. तशीच ती कसबा आणि चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी पाळावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांना केले आहे.

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर भाजपने कसब्यातून हेमंत रासने आणि चिंचवड मधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फोन डिप्लोमासी करून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न चालवला आहे, तर राज ठाकरे यांनी त्यासाठी पत्र प्रपंच केला आहे.

या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्वतः फोन करून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीररीत्या तसे आवाहन केले आहेच. महाविकास आघाडीचे घटक पक्ष या सर्व नेत्यांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Kasba, chinchwad Byelection : CM eknath shinde called MVA leaders, raj Thackeray writes a letter to hold election unopposed

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात