महाविकास आघाडी स्थापन करण्याचा हेतू संपुष्टात आला आहे. ठाकरे पवार सरकार पडले आहे. शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारने बहुमत साबित करून कारभाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडीचे मूलभूत राजकीय प्रयोजन संपुष्टात आले आहे. Congress NCP Agitation against remaining aurangabad, exit plan from MVA
पण ज्या ठाकरे – पवारांमुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली ती एकदम मोडायची कशी??, त्याला काहीतरी कारण शोधले पाहिजे म्हणून सध्या महाविकास आघाडी कागदावर अस्तित्वात शिल्लक आहे. पण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मात्र त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानानुसार पुरेसे कारण हाती आले आहे किंबहुना त्यांना ते शोधण्याची गरजही पडलेली नाही ते महाविकास आघाडीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतच पेरून ठेवण्यात आले आहे, ते म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर आता याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी मोठे आंदोलन उभे करून काँग्रेस काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे दाद मागितली आहे.
– नामांतर विरोधात आंदोलन
महाविकास आघाडीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेचे फक्त 4 मंत्री उपस्थित होते बाकीच्या मंत्र्यांनी तर बंडच केले होते. पण तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मंत्रिमंडळाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर करून घेतले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी संबंधित ठरावाला पाठिंबा दिला होता. मात्र आता त्याच दोन पक्षांचे कार्यकर्ते या नामांतराविरुद्ध आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद मध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले आहे. हे एक प्रकारे महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एक्झिट साठी लिहिले गेलेले स्क्रिप्ट आहे.
– नामांतराचा विरोध एक्झिट प्लॅन
तशीही महाविकास आघाडीची सत्ता गेलीच आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकमेकांशी तत्त्वज्ञानाच्या पातळीवर नाळ जुळत नाही. त्यामुळे एकत्र राहून एकमेकांच्या मतपेढ्यांना एकत्र राहून धक्का लावण्यात मतलब नाही. म्हणून मग एक्झिट प्लॅन तर शोधलाच पाहिजे म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना नामांतराचा मुद्दा आयता हाती दिला आहे. किंबहुना हे सगळे स्क्रिप्टेड आहे.
– नामांतर विरोध हा स्क्रिप्टचा पहिला चॅप्टर
जसे महाराष्ट्रातील सत्तांतर केंद्राने स्क्रिप्ट लिहिल्यानुसार पार पडले तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्क्रिप्ट लिहून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्लॅन केला आहे. औरंगाबाद मध्ये नामांतर विरोधात झालेले आंदोलन या स्क्रिप्टचा पहिला चॅप्टर आहे. आता औपचारिक रित्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील आणि आपापल्या मार्गाने निवडणुका लढवायला मोकळे होतील हे आजचे सात जून सात जुलै 2024 चे चित्र आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App