Congress Nana Patole : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 दिवसांत प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. यानंतर त्यांनी आपल्या दिल्लीतल्या निवासस्थानी 15 भाजपविरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. राष्ट्र मंचच्या बॅनरखाली ही बैठक होणार असल्याने यूपीएशिवाय तिसऱ्या पर्यायाच्या प्रयत्नावर चर्चा सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही. Congress Nana Patole Says Its Not First Attempt Of Sharad pawar on meeting With 15 Opp Party against BJP
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 दिवसांत प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. यानंतर त्यांनी आपल्या दिल्लीतल्या निवासस्थानी 15 भाजपविरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. राष्ट्र मंचच्या बॅनरखाली ही बैठक होणार असल्याने यूपीएशिवाय तिसऱ्या पर्यायाच्या प्रयत्नावर चर्चा सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही.
दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी उद्या दुपारी 4 वाजता 15 विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 2024च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भाजपला पर्यायाने मोदींना पर्याय देण्यासाठी या बैठकीत मंथन होणार असल्याचे कळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस या बैठकीत असण्याची शक्यता कमी आहे. काँग्रेसच्या म्हणजेच सोनिया गांधींच्या नेतृत्वात आधीच यूपीए अस्तित्वात आहे. परंतु यूपीएचा मोदींविरुद्ध प्रभाव पडू शकला नाही. यूपीए अपयशी ठरल्यानेच राष्ट्र मंचच्या बॅनरखाली नवा प्रयत्न सुरू झाला आहे.
नाना पटोले म्हणाले की, पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरणे बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. दरम्यान, यापूर्वी संजय राऊत यांनी शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं, असे अनेकदा बोलून दाखवलं होतं. परंतु त्याला विरोध करत पटोले म्हणाले होते की, शिवसेना ही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे ते यावर बोलू शकत नाहीत. यूपीएचं नेतृत्व करायला सोनिया गांधी सक्षम आहेत.
Congress Nana Patole Says Its Not First Attempt Of Sharad pawar on meeting With 15 Opp Party against BJP
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App