राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितनिष्ठ विरुद्ध शरदनिष्ठ अशी फूट पडल्यानंतर राजधानी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेस बैठकीचे वर्णन, “काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!”, असेच वर्णन करावे लागेल. कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला आता काँग्रेस हायकमांडने संपूर्ण महाराष्ट्रभर बस यात्रा काढण्याचे आदेश दिले आहेत आणि या बस यात्रेद्वारे काँग्रेस लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळाच्या लढाईची तयारी करणार आहे. Congress may contest loksabha and assembly elections own it’s own and not with thackeray – pawar
काँग्रेस हायकमांडने काल महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलवून त्यांच्याशी सुमारे 4.00 तास दीर्घ चर्चा केली आणि महाराष्ट्रातून लोकसभेच्या किमान 20 जागा काँग्रेसने जिंकल्या पाहिजेत, असे टार्गेट दिले. त्याचबरोबर महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस नंबर 1 वर आली पाहिजे, असेही आदेश दिले.
या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना बैठकीतले “स्वबळाचे रहस्यच” वेगळ्या भाषेत उलगडले. ज्या अर्थी काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना पुन्हा नंबर 1 होण्याचे आदेश दिलेत, त्याअर्थी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे घटलेले बळ किंबहुना महाराष्ट्रातली विरोधी पक्षांची सगळी “पॉलिटिकल स्पेस” काँग्रेसनेच भरून काढण्याचे आदेश वेगळ्या भाषेत दिल्याचे मानले पाहिजे.
महाविकास आघाडी टिको किंवा संपो, काँग्रेसला त्यामुळे काही फरक पडता कामा नये. काँग्रेसने लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका स्वबळावरच लढण्याची तयारी करावी, अशा परखड सूचना काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेशाच्या नेत्यांना दिले.
#WATCH | Congress national president Mallikarjun Kharge and party leader Rahul Gandhi hold a meeting with leaders of Maharashtra Congress, at the party HQ in Delhi. pic.twitter.com/7NGXbUpKW3 — ANI (@ANI) July 11, 2023
#WATCH | Congress national president Mallikarjun Kharge and party leader Rahul Gandhi hold a meeting with leaders of Maharashtra Congress, at the party HQ in Delhi. pic.twitter.com/7NGXbUpKW3
— ANI (@ANI) July 11, 2023
वज्रमुठ इतिहासजमा
तसेही आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी नावालाच उरली आहे. आघाडीच्या वज्रमूठ सभा इतिहासजमा झाल्या आहेत. त्यातल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन पक्षाध्यक्षांकडे स्वतःचे पक्षच उरले नाहीत. उरल्यात फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नावांच्या संघटना!! त्यामुळे महाराष्ट्रातली विरोधी पक्षाची संपूर्ण “पॉलिटिकल स्पेस” रिकामी झाली आहे. ती भरून काढणे हे खऱ्या अर्थाने काँग्रेस पुढे आव्हान आहे आणि हे आव्हान जर काँग्रेसने पेलले, तर काँग्रेसला महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस – अजितदादा या त्रिकूटाविरुद्ध स्वबळावर लढण्याइतपत ताकद मिळण्याची शक्यता आहे.
भारत जोडो यात्रेचा पुढचा टप्पा
राहुल गांधींनी आपली भारत जोडो यात्रा मराठवाड्यातून नेऊन थोडीफार वातावरण निर्मिती केली होती. पण त्यात सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय काढल्याने सगळ्या वातावरण निर्मितीवर पाणी फेरले. पण आता भारत जोडो यात्रेच्या पुढचा भाग म्हणूनच प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर बस यात्रा काढावी, असे आदेश काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिले आहेत.
नंबर 1 होण्यासाठी
पावसाळा संपला की महाराष्ट्रातले काँग्रेस नेते बस यात्रा काढणार आहेत. या बस यात्रेद्वारे कोणतेही अनावश्यक वाद विषय न काढता काँग्रेस नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र जर खरंच पिंजून काढला, तर काँग्रेस संघटनेला गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर संजीवनी देणे कठीण नाही. कारण ठाकरे – पवारांची मूळ ताकदच आता दोघांच्या हातातून पक्ष निसटल्यामुळे क्षीण झाली आहे. ठाकरे – पवारांनी इथून पुढच्या काळात कितीही मेळावे, सभा घेतल्या तरी त्यांची भाषणे ऐकण्यासाठी मिळणारा प्रतिसाद आणि माध्यमांचे रिपोर्टिंग वगळता यापलीकडे या दोन्ही नेत्यांची फारशी ताकद दिसणार नाही. मेळावे, जाहीर सभा यांचा उपयोग या दोन्ही नेत्यांना होण्याची शक्यता दुरापास्त आहे. कारण त्यांच्याकडे तशी पक्ष यंत्रणा उरलेली नाही.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रात बस यात्रा विशिष्ट मर्यादेपर्यंत जरी यशस्वी करून दाखविली, तरी काँग्रेसला इतर दोन पक्षांच्या म्हणजेच ठाकरे – पवारांच्या पक्षांच्या तुलनेत निश्चित वरचे स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस बस यात्रेची वाट चालणार असेल, तर आघाडी मोडून स्वबळाच्या दिशेने त्यांची वाटचाल होण्याची शक्यता आहे.
अशा स्थितीत काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात नंबर 1 होईल की नाही, हे आत्ताच्या घडीला सांगता येणार नाही, पण काँग्रेसने बस यात्रा यशस्वी केली तर जुन्या पुराण्या महाविकास आघाडीत मात्र तो नंबर 1 चा पक्ष होऊ शकतो, याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आजची 12 जून 2023 ची राजकीय परिस्थितीत त्याकडेच अंगुली निर्देश करते आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more