Rajya Sabha By polls : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर बिनविरोध निवड होण्याकरिता भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती करण्यासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तथापि, काँग्रेसने घेतलेल्या पवित्र्यावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. Congress Leaders Nana Patole Balasaheb Thorat Meets Devendra Fadnavis On Rajya Sabha By polls
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर बिनविरोध निवड होण्याकरिता भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती करण्यासाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तथापि, काँग्रेसने घेतलेल्या पवित्र्यावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपसमोर लोटांगण घातल्याची भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून व्यक्त होत आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा बिनविरोध निवडणुकीच्या बदल्यात भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांपुढे ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे. याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना, तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, एखाद्याच्या निधनानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी ही परंपरा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. यामुळे फडणवीसांची भेट घेऊन त्यांना उमेदवार मागे घेण्याची विनंती करण्यासाठी काँग्रेस नेते गेले आहेत.
राज्यात होणाऱ्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळेच राष्ट्रवादी-शिवसेना नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसला आपल्या सत्तेतील सहकारी पक्षांवर विश्वास नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार रजनी पाटील यांच्या विरोधातील भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही, ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल. संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील, असंही पटोले म्हणाले.
या भेटीनंतर फडणवीस म्हणाले की, ‘आमच्या पक्षात कुठलाही निर्णय मी एकटा घेत नाही. पक्षाच्या कोअर कमिटीशी मी चर्चा करेन आणि त्या आधारावरच निर्णय होऊ शकतील. आता तरी कोअर कमिटीने ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आम्ही फॉर्म भरल्याचं फडणवीस म्हणाले. निवडणूक बिनविरोध व्हायची असेल तर त्यांनी त्यासाठी नक्की प्रयत्न करावा. आम्हाला प्रतिप्रश्न करून निवडणूक कशी बिनविरोध होईल? भारतीय जनता पक्षाने काही विचार करूनच फॉर्म भरला असेल. समजा उद्या नाही लढवायची असंही कोअर कमिटीच ठरवेल,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
Congress Leaders Nana Patole Balasaheb Thorat Meets Devendra Fadnavis On Rajya Sabha By polls
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App