विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्याशी महाविकास आघाडी विषयी चर्चा केली आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाणांवर तोंडसुख घेतले.Congress leaders attack Ashok Chavan after meeting Pawar; They claimed to have left the field as they were not true soldiers!!
वरिष्ठ नेत्याने एवढे भित्रे असू नये, जो सच्चा शिपाई असतो, तो मैदान सोडत नाही, असा हल्लाबोल रमेश चन्नीथला यांनी केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बड्या नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर सर्वांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाणांवर टीका केली. पण अशोक चव्हाणांवर केलेल्या टीकेपेक्षा रमेश चेन्नीथला यांनी शरद पवारांची भेट घेणे या विषयावर सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा झाली आणि ट्रोल झाले.
अशोक चव्हाण यांना काँग्रेसने काय कमी केले?? दोन वेळा मुख्यमंत्री, 14-15 वर्ष मंत्रिपद दिले, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य, आमदारकी, खासदारकी दिली. अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली?? त्यांनी खरे कारण सांगावे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता माफ करणार नाही, असा दावा रमेश चेन्नीथला यांनी केला.
रमेश चेन्नीथला काय म्हणाले?
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या सर्व नेत्यासोबत चर्चा केली. काँग्रेस मधून अशोक चव्हाण सोडून बाकीचे कोणीही पक्षातून बाहेर जाणार नाही. परवा दुपारी 2.00 वाजेपर्यंत अशोक चव्हाण आमच्यासोबत बैठकीला उपस्थित होते पण ते आम्हला काही बोलले नाहीत. त्यांनी काँग्रेस का सोडली त्यांच्याकडे कुठलेही कारण नाही. काँग्रेसमध्ये त्यांना अनेक पदे दिली. मुख्यमंत्री पद त्यांना देण्यात आलं. असे पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता स्वीकार करणार नाही. अशोक चव्हाण यांनी सांगायला हवं, की त्यांच्यावर ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे का?? काँग्रेसमध्ये काही अडचण होती का?? आज माझी बैठक झाली, राज्यातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगावं. ही त्यांची जबाबदारी आहे. नांदेडचे नगसेवक आम्हाला भेटायला आले. त्यांना सुद्धा चव्हाण यांनी सांगितलं नाही पक्ष प्रवेश बद्दल. आम्ही कमजोर होणार नाही, अजून ताकदीने लढू. मी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याशी बोललो, ते सुद्धा आपल्यासोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली, आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून काम करणार आहोत, महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबुतीने पुढे जात आहे, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काही फरक पडणार नाही, असं चेन्नीथला म्हणाले.
अशोक चव्हाणांच्या फेरस्वागतला नाना तयार
अशोक चव्हाण यांना पक्षाने विशेष महत्व पक्षात दिले होते. अशोक चव्हाण यांना मागच्या रांगेत आता बसावे लागेल, कारण मला तिकडचा चांगला अनुभव आहे. बाळासाहेब थोरातांसारख्या वरिष्ठांना डावलून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद दिले. नेतृत्व करायची त्यांना सवय आहे. त्यांना तिकडे ती संधी मिळणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App