नाशिक: नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी यांची चौकशी आणि तपासाच्या मुद्द्यावर काँग्रेस एवढी बेहाल झाली आहे, की त्यांचे नेते सत्याग्रहाच्या नावाखाली एकापाठोपाठ एक बेताल वक्तव्ये करत आहे. Congress leader subodhkant sahay compared Narendra modi with Hitler
बंगलोर मध्ये काँग्रेसच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “कुत्ते की मौत” होईल, असे अर्वाच्च वक्तव्य केले होते, तर त्यापुढे जाऊन केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुबोधकांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरशी करून त्यांचा शेवट हिटलर सारखाच होईल, असे वक्तव्य केले आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे काँग्रेस माजी प्रभारी हरीश रावत यांनी सुबोधकांत सहाय यांचे खरा सत्याग्रही असेच बोलेल असे विचित्र समर्थन केले आहे.
मात्र, या वक्तव्यानंतर देशभरात उसळलेला संताप पाहून काँग्रेसचे नुकतेच बदललेले मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी मात्र काँग्रेस पक्षाचे अंग या वक्तव्याने मधून काढून घेतले आहे. काँग्रेस पक्ष कोणत्याही प्रकारच्या बेताल वक्तव्याला पाठिंबा देत नाही, असे ट्विट जयराम रमेश यांनी करून या दोन्ही नेत्यांना झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
– टिळक, जगतापांच्या मतदानावर आक्षेप
पण काँग्रेस साठी जे राजकीय डॅमेज व्हायचे ते होऊन गेले आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अशी अश्लाघ्य वक्तव्य करणे आणि दुसरीकडे महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीत भाजपचे दोन आजारी आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेऊन काँग्रेसने महाराष्ट्र देखील आपली हलकी मनोवृत्ती दाखवून दिली आहे.
– घटना तज्ञांचा निर्वाळा
आजारी व्यक्तीने मतदान करताना कोणाचे सहाय्य घेतले आणि त्यासाठी निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेतली तर त्यात कोणतेही कायदेशीर अक्षय फारसे काही नाही असा निर्वाळा घटनातज्ञ उल्हास बापट यांनी दिले आहेत राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळला आहे. परंतु, तरी देखील त्यांनी त्याविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार मागून आपली आणखी हलकी मनोवृत्ती दाखवून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App