Congress पवारांची राष्ट्रवादी बुडाला तर बेडूक, उडाला तर कावळा, पण काँग्रेसला बंगाल सारखा महाराष्ट्रात wipe out चा धोका!!

नाशिक: Congress  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर धक्का बसलेल्या पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आता काय होणार??, वस्ताद कोणता नवा डाव टाकणार??, शरद पवार आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र येणार का??, तसेही ते आतून एकच आहेत, वगैरे चर्चांची राळ उडवून शरद पवारांना बातम्यांमध्ये ठेवले. Congress faces wipe out danger in maharashtra

शरद पवारांनी देखील निकालाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आपण नव्याने पक्ष उभारणी करू, असे सांगून त्या चर्चेला हवा देऊन टाकली. सुप्रिया सुळे मात्र 48 तासानंतर बाहेर येऊ त्यांनी ट्विटरवर फक्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पराभव मान्य करून टाकला.

दरम्यानच्या काळात अजित पवार आणि रोहित पवार असा एपिसोड घडला आणि त्यानिमित्ताने राम शिंदे यांनी पवार कुटुंबीयांना ठोकून काढले.

या सगळ्यांमध्ये काँग्रेसची नेमकी अवस्था काय आणि तिचे भवितव्य काय असेल??, याकडे मात्र कुठल्या पवारनिष्ठ मराठी माध्यमांचे लक्ष गेले नाही. किंवा त्यांनी लक्ष दिले नाही. पण ते काही असले तरी शेवटी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे “बुडाला तर बेडूक आणि उडाला तर कावळा” अशीच आहे. कारण पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काहीही झाले तरी पवारनिष्ठ माध्यमे शरद पवारांचे नाव कायम चर्चेत ठेवणारच आहेत.

पण काँग्रेसच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही शेवटी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये मजबूत संघटना असलेल्या पक्ष आहे. गावागावांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आजही प्रतिकूल परिस्थितीत टिकून आहेत, पण विधानसभा निवडणुकीनंतर मात्र महाराष्ट्रातल्या काँग्रेसची अशी काही अवस्था होऊन बसली आहे की, ती एका विशिष्ट वळणाच्या टप्प्यावर येऊन ठेपल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे सगळे दिग्गज नेते एकाच विधानसभा निवडणुकीत पराभूत होण्याचा विक्रम घडल्याने काँग्रेसला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा नव्याच नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे, पण त्याहीपेक्षा सगळ्यात मोठा धोका पश्चिम बंगाल सारखा काँग्रेस महाराष्ट्रातून wipe out होण्याचा निर्माण झाला आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. कारण काँग्रेस सारखा तळागाळातला पक्ष पूर्णपणे नेस्तनाबूत होणे हे काही महाराष्ट्रातल्या लोकशाहीसाठी चांगले लक्षण नव्हे.

पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस एकेकाळी प्रचंड ताकदीनिशी सत्तेवर असलेला पक्ष होता. पण नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामुळे आणि त्याही नंतर तृणमूळ काँग्रेसमुळे काँग्रेस पक्षाची ताकद टप्प्याटप्प्याने घटत गेली. आज बंगालमध्ये काँग्रेस 0 अवस्थेत आहे. महाराष्ट्रात त्याच अवस्थेकडे काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेसला महाराष्ट्रात 0 अवस्थेपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी जोर लावून ढकलत आहेत.

महाराष्ट्रातल्या काँग्रेसला नस्तनाबूत होण्याच्या अवस्थेपर्यंत आणून ठेवण्यात काही केवळ फक्त भाजपने त्या पक्षाचा पराभव केला हे कारण बिलकुल नाही. उलट काँग्रेस गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने पोखरत राहिली आणि ती शरद पवारांसारख्या नेत्याने पोखरत ठेवली. काँग्रेसच्या संघटनेच्याच आणि नेत्या कार्यकर्त्यांच्या बळावर स्वतःची राष्ट्रवादी पोसली आणि तिला सत्तेच्या वळचणीला नेऊन ठेवले हे देखील तितकेच महत्त्वाचे कारण काँग्रेसच्या घसरणीसाठी ठरले. किंबहुना जास्त कळीचे कारण ठरले.

आता काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा देखील माध्यमांनी रंगवली आहे. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये राहून आणि काँग्रेसच्या बाहेर जाऊन दोन्हीकडे काँग्रेसच पोखरली. तेव्हा पवार पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊन जाऊन काय करणार??, हाच सवालच आहे. कारण खुद्द पवारांच्या पक्षाची अवस्था काँग्रेसपेक्षा वेगळी नाही!!

Congress faces wipe out danger in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात