प्रतिनिधी
सोलापूर : कर्नाटकच्या विजयानंतर केंद्रातील सत्तेवर दावा सांगत महाराष्ट्र काँग्रेस निश्चितच अधिक आक्रमक झाली आहे खरी पण ती महाविकास आघाडीतल्या अधिक जागांवर दावा करून!! Congress aggressively demands madha loksabha constituency from NCP
सोलापुरात काँग्रेसच्या झालेल्या मेळाव्यात तीन माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध जोरदार एल्गार पुकारला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्याची प्रतिज्ञा केली, पण त्याचवेळी महाविकास आघाडीत त्यांनी काँग्रेसच्या जागांचा वाटा वाढवून मागितला. राष्ट्रवादीच्या वाट्याची माढ्याची जागा देखील त्यांनी काँग्रेस जिंकण्याचा दावा केला.
कर्नाटकच्या पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सैरभैर झालेत, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला, तर नानांनी सोलापूर ही जागा तर काँग्रेसची आहेच पण माढा देखील जिंकली पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादीला डिवचले.
मध्यंतरी आमदार रोहित पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा असल्याचा असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार??, ते पोरकट आहेत. मॅच्युरिटी यायला वेळ लागेल!!, असे खणखणीत प्रत्युत्तर देऊन रोहित पवारांचे वाभाडे काढले होते.
नानांनी देखील आज सोलापुरात येऊन कोण काहीही बोलून जाते. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सोलापुरात सुशील कुमार शिंदे उभे राहिले तर त्यांना खासदार करा, असे आवाहन हजारोंनी हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना केले. पण त्याचवेळी त्यांनी माढाची जागा ही जिंकलीच पाहिजे, यावर भर दिला. त्यामुळे काँग्रेस एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्यात जरी आक्रमक दिसली तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीत जागावाटपाच्या खेचाखेचीत सोलापुरातून काँग्रेस नेत्यांनी ठिणगी टाकली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App