प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे दोन उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून यामध्ये ट्विस्ट आणला आहे. आपली कटिबद्धता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आहे आणि बांधिलकी जनतेशी आहे, असे संभाजीराजे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. परंतु या ट्विट मधून त्यांनी आपल्या राज्यसभा अपक्ष उमेदवारी बद्दल सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे!! Commitment to the thoughts of Chhatrapati Shivaji Maharaj, commitment to the people
संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी पाठिंबा देण्याचे शिवसेनेने नाकारल्यानंतर संभाजी राजे समर्थक संतप्त झाले. त्यांनी आता राज्यसभा नव्हे, तर संपूर्ण राज्य ताब्यात घेणार असे बॅनर सोशल मीडियामध्ये व्हायरल केले. त्यामधून देखील संभाजीराजे यांची सर्व पक्षांपासून बाजूलाच राहण्याची भूमिका अधोरेखित झाली. पण सर्व पक्षांपासून फटकून राहणे राजकीय दृष्ट्या किती योग्य ठरेल??, याचा अंदाज मात्र अद्याप यायचा आहे.
महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी… pic.twitter.com/UnOir6CWSr — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 26, 2022
महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय…
मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी… pic.twitter.com/UnOir6CWSr
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 26, 2022
या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज सकाळी ट्विट करून आपल्या भूमिकेबाबत काहीशी स्पष्टता आणि काही सस्पेन्स तयार केला आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतले स्वराज्य घडवायचे आहे. आपल्या विचारांची बांधिलकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आहे आणि जनतेशी आपली बांधिलकी आहे, असे ट्विट करून त्यांनी स्वतःला राजकीय पक्षांच्या कक्षेबाहेर ठेवले आहे. मात्र त्याच वेळी आपली राज्यसभेचे अपक्ष उमेदवारी कायम राहणार की नाही??, उमेदवारी अर्ज दाखल करणार की नाही??, त्यासाठी मतांची बेगमी कशी करणार??, या प्रश्नांची उत्तरे मात्र अजूनही सस्पेन्स ठेवली आहेत.
शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. ते आपल्या प्रचाराला सुरुवातही करतील. त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असणार आहेत. यानंतर संभाजीराजे नेमकी कोणती भूमिका जाहीर करतील??, याविषयी उत्सुकता वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App