कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. Come greetings on the day of valor on a January; But don’t rush! – Ramdas remembered
विशेष प्रतिनिधी
पुणे : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की ,एक जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी यावे. मात्र, या ठिकाणी गर्दी करून नये.अस आवाहन आठवले यांनी केले .
पुढे आठवले म्हणले की अभिवादन करून लगेचच आपापल्या घरी परतावे.जेणेकरून कोरोनापासून सर्वांचा बचाव होऊ शकेल.कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने शिस्त पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन रामदास आठवले यांनी आज केले. शौर्य दिनाच्या तयारीची माहिती आज आठवले यांनी घेतली.चार वर्षापूर्वी एक जानेवारीला झालेल्या संघर्षात काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत.हे गुन्हे मागे घ्यावेत,अशी मागणी आठवले यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App