थंडीची हुडहुडी दिवाळीनंतरच, पाऊसमान लांबले, ऋतुचक्र बदलल्यामुळे फेरबदल झाल्याचा अंदाज

वृत्तसंस्था

पुणे :थंडीची हुडहुडी दिवाळीनंतरच अनुभवता येणार आहे. कारण पाऊसमान लांबले असून ऋतुचक्रात फेरबदल झाल्यामुळे हा परिणाम होत आहे, असा अंदाज आहे. Cold snaps after Diwali, prolonged rains, change due to change in seasons

जून- सप्टेंबर हे पावसाचे महिने ओळखले जातात. त्यामुळे ऑक्टोबरोपासून खरे तर थंडीला सुरुवात होणे अपेक्षित आहे. मॉन्सूनच्या वारे महाराष्ट्रातून निघून गेले आहेत. पण,समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे पावसाचा कालावधी वाढून थंडी पडायचा कालावधी लांबत चालला आहे, असे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञाकडून सांगण्यात येते. त्यामुळे नोव्हेंबरच्या माध्यानंतर थंडीची खरी चाहूल लागेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये या ऋतुचक्रामध्ये मोठा बदल होत आहे. महाराष्ट्रात नैर्ऋत्य मोसमी पावसाची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली. पाचच दिवसांत त्याने संपूर्ण राज्य व्यापून देशाच्या इतर भागांत प्रवेश केला. राजस्थानमधून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास तब्बल १९ दिवस उशिराने सुरू झाला. तरी महाराष्ट्रातून नियोजित वेळेपूर्वी एक दिवस आधीच १४ ऑक्टोबरला मोसमी वारे माघारी गेले. त्यानंतरही बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आणि विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हा पाऊस तुरळक ठिकाणी १८ ऑक्टोबरपर्यंत कायम होता.



पावसाचा हा लांबलेला कालावधी गेल्या काही वर्षांमध्ये ‘ऑक्टोबर हीट’ची तीव्रता कमी करण्यासह थंडीचा कालावधी कमी करीत आहे. यंदाही पाऊस लांबला आहे. पुढील एक ते दोन दिवसांत राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होऊन तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र, तापमानवाढ अतितीव्र राहणार नाही,असे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

पुन्हा चक्रीवादळाचा धोका

यंदा दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे. या कालावधीत थंडी नसेल. अगदी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत चांगली थंडी अनुभवता येणार नाही. १५ नोव्हेंबरनंतर थंडीची चाहूल लागेलं, असा अंदाज आहे. हवामान बदलांमुळे ऑक्टोबरमधील तापमानवाढीची तीव्रताही कमी झाली आहे. यंदाही नोव्हेंबरच्या मध्यानंतर थंडी वाढू शकेल. नोव्हेंबरच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळेही थंडीवर परिणाम होण्याची शक्यता असते, असे हवामान खात्यातील शास्त्रज्ञानी सांगितले.

Cold snaps after Diwali, prolonged rains, change due to change in seasons

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात