नाशिक : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला. नेमकी त्याच दिवशी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या कारागृहातील वर्तणूकी विषयी बातमी बाहेर आली आहे. हा वेगळा राजकीय योगायोग असल्याची चर्चा राजधानी मुंबईतील वर्तुळात आहे. Coincidence of shock to Shiv Sena and news of Nawab Malik’s behavior in jail
राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांनी जंग जंग पछाडले. पण तरीही त्यांना मतदानाची परवानगी न्यायालयाने नाकारल्याने भाजपवर टीका झाली. पण याच नवाब मलिक यांनी कारागृहातील नियम पाळायला नकार दिल्याची ही बातमी आली आहे.
दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉंन्ड्रिंग केल्याने कारागृहात जावे लागलेले नवाब मलिक यांनी पहिल्याच दिवशी कारागृहातील काही नियम पाळण्यावरून कारागृहातील अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मलिक यांना तपासणीसाठी विवस्त्र होण्यास सांगितले असता, त्यांनी आक्षेप घेऊन कारागृहातील अधिका-यांशी वाद घातल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कारागृहातील अधिका-यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. तसेच असला कुठलाही प्रकार झाला नसल्याचे एका अधिका-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. “हिंदुस्थान पोस्ट”ने ही बातमी दिली आहे.
– मलिकांनाही कैद्यांचे नियम लागू
मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर ईडी कोठडी संपताच न्यायालयाने मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मलिक यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. कारागृहातील सर्व प्रकारच्या कैद्यांसाठी असणारे नियम हे मलिक यांना लागू करण्यात आले. त्यावेळी त्यांची झडती घेण्यात आली. त्यानंतर एका खोलीत त्यांना विवस्त्र होऊन तपासणी करायची असल्याचे सांगण्यात आले असता, त्यांनी याबद्दल आक्षेप घेत अधिका-यांच्याशी वाद घातला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नवाब यांनी अधिका-यांना धमकी देखील दिली, असेही बोलले जात आहे. मात्र याबाबत कारागृह प्रशासन तसेच अधिका-यांनी त्याला दुजोरा दिला नसून, याबाबत बोलण्यास टाळले. परंतु कारागृहातील नियम सर्वांना सारखे असतात आणि ते कारागृहात पाळले जात असतात, असे एका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
– कारागृहातील नियम
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App