वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात सर्वत्र महागाईचा भडका उडाला आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. मात्र वाढत्या महागाईत सामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या महिन्याभरात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये 9 % घसरण झाली आहे. खाद्यतेल स्वस्त झाले असून पुढील काही महिन्यांमध्ये खाद्यतेलाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. Good news: Edible oil will be cheaper in the near future; 9% fall
– तेलाच्या किमती घटल्या
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने किमती आता कमी झाल्या आहेत. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, पाम ऑईल आणि नारळ तेलाच्या दरात घसरण झाली आबे. त्याचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर देखील झाला असून, सूर्यफूलाचे तेल वगळता भारतात इतर तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.
मध्यंतरी इंडोनेशियाने पाम तेलाची निर्यात बंद केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा इंडोनेशियाकडून खाद्य तेलाच्या निर्यातीवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे भारतात होणारा तेलाचा पुरवठा वाढला आहे. यामुळे खाद्या तेलाच्या दराच मोठी घसरण झाली आहे, आणि येत्या काळात सुद्धा खाद्यतेलाच्या किमती आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App