विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज, १ एप्रिल पासून १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी झाला. राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे. CNG fuel for vehicles is cheaper
मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) 3 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला असे महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
७ राज्यांमध्ये पेट्रोल शंभरच्या वर; आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी 60 रुपये प्रति किलो तर पीएनजी 36 रुपये प्रति एससीएम असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे हे इंधन स्वस्त झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App