फडणवीस व राज ठाकरे यांनी कोरोनाशी सामना करण्याबाबत सरकारला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिल्यावरच मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंधांची घोषणा केली, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. CM Uddhav Thackeray announces lockdown after assurances of co operation from Fadnavis and Raj Thackeray Saamana Editorial
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच विरोधी पक्षांशी चर्चा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. फडणवीस व राज ठाकरे यांनी कोरोनाशी सामना करण्याबाबत सरकारला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिल्यावरच मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंधांची घोषणा केली, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
मात्र काल अत्यावशक सेवा वगळता सर्व बंद असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावरून चांगलाच गोंधळ उडाला आहे. अजूनही लॉकडाउन आहे किंवा नाही याच संभ्रमात सामान्य नागरिक दिसत आहेत.
या महामारीला रोखण्यासाठी सरकार हे सगळे करीत आहे. राज्यात आता लागू केलेले कडक निर्बंध आणि सप्ताहाअखेरचे लॉकडाऊन त्याचाच भाग आहे. या मिनी लॉक डाऊनमुळे धार्मिक स्थळे, चित्रपट-नाट्यगृहे, सलून, पार्लर, दुकाने, मॉल, बाजारपेठा बंद राहतील. ‘वर्क फ्रॉम होम’वर भर द्यावा लागेल, असंही अग्रलेखात म्हटलंय.
‘मिशन ब्रेक द चेन’ यशस्वी करणे हे नागरिकांच्याच हाती
मंत्रालये, सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने काम करतील. मात्र ‘मिशन ब्रेक द चेन’ यशस्वी करणे हे नागरिकांच्याच हाती आहे. शेवटी हा लढा जगण्यासाठी आहे, तो प्रत्येकाने लढायचा आहे!
सरकारला पुन्हा एकदा ‘ब्रेक द चेन’ या पहिल्या थांब्यावर यावे लागले…
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मिशन बिगीन अगेन’ या घोषवाक्यांना सरकारने मागील काही दिवसांत महत्त्व दिले, पण शेवटी आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याने सरकारला पुन्हा एकदा ‘ब्रेक द चेन’ या पहिल्या थांब्यावर यावे लागले आहे.
फडणवीस आणि राज ठाकरेंकडून सहकार्याच्या आश्वासनानंतरच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर केलं. राज्यात मिनी लॉक डाऊन जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील सर्वच विरोधी पक्षांशी चर्चा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. फडणवीस व राज ठाकरे यांनी कोरोनाशी सामना करण्याबाबत सरकारला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिल्यावरच मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App