प्रतिनिधी
नागपूर : केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या रस्तेबांधणी शिवसैनिक आणत असलेल्या अडथळा बद्दल कडक शब्दांत पत्र लिहिले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावरकोणतेही उत्तर दिले नव्हते.CM Uddhav Thackeray and Union Minister Nitin Gadkari praised each other in Nagpur Metro inauguration
परंतु आज मात्र नागपूरमधील मेट्रोच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी गडकरींच्या त्या पत्रावर टोलेबाजी करून घेतली. मुख्यमंत्री म्हणाले की नितीन जी, तुम्ही फार गोड बोलता पण कडक शब्दांत पत्र लिहिता. तुम्ही कर्तव्यकठोर आहात. आम्ही कर्तव्यकठोर आहोत.
जनतेला दिलेला शब्द पाळायचा. जनतेशी गद्दारी करायची नाही, ही शिकवण आपल्याला शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. ती आपण दोघेही पाळतो आहोत. परंतु तरीही मी आपल्याला एक निश्चित ग्वाही देतो की कोणत्याही विकास कामांमध्ये आम्ही अडथळे आणून देणार नाही.
जे अडथळे असतील ते अडथळे दूरच करू. महाराष्ट्रात केंद्र सरकार बांधत असलेल्या रस्ते बांधणीच्या उपक्रमाचे आम्ही स्वागतच करतो, असे आश्वासन नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना दिले.
नितीन गडकरींनी देखील मुख्यमंत्र्यांची या कार्यक्रमात माफक स्तुती करून घेतली. नागपूरच्या मेट्रोचे उद्घाटन झाले, पण या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची राजकीय जुगलबंदी रंगली आणि त्या जुगलबंदीचीच सोशल मीडियावर जास्त चर्चा झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App