विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास दिला जातोय, वसुली केली जात आहे, अशा तक्रारी उद्योजकांकडून आमच्याकडे येत असतात. मात्र, हे खपवून घेतले जाणार नाही. उद्योगांना त्रास देणारा महायुतीचा किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असूद्यात, त्याला सोडू नका. त्यांच्यावर थेट मकोका लावा. या लोकांवर मकोकाच्या खालची कारवाईच करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिसांना दिली.CM Fadnavis
पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालय महाळुंगे औद्योगिक पोलिस संकूल, पोलिस विश्रामगृह देहू रोड या इमारतींचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर आणि आणि आसपासच्या परिसरात एक मोठा औद्योगिक भाग तयार होत असल्याने या ठिकाणी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज निर्माण झाली. त्यासाठी पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालय तयार केले. मात्र, अधूनमधून पुणे आणि पिंपरी – चिंचवडच्या उद्योगामधून आमच्याकडे तक्रार येते. आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केले जात आहे, आमच्याकडून वसुली केली जात आहे, अशा तक्रारी हे गुंतवणूकदार करतात. काहीही झाले तरी हे खपवून घेतले जाणार नाही. मी तुम्हाला आज ऑथराइज करत आहे. काही राजकीय पक्षांचे लोक हे प्रकार करत असतील. आमचे असतील, अजित दादांचे असतील, शिंदे यांचे असतील. पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी याबाबत कुठलीही तडजोड करायचे नाही.
देशात नवाेदित उद्याेजकांची कमतरता कधीच नव्हती, परंतु त्यांच्यासाठी याेग्य व्यासपीठ नव्हते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मेक इन इंडियाअंतर्गत उद्याेजकांना संधी दिली. जगातील श्रीमंत देशांच्या पाठीशी संरक्षण सामग्री निर्मिती आहे. आपण अनेक डिफेन्स कंपन्या सुरू केल्या, परंतु बदलत्या तंत्रज्ञानाधारे अत्याधुनिक शस्त्रनिर्मिती करण्यात आली नाही. याचा अनुभव आपल्याला कारगिल युद्धात आला. आता सर्व युद्ध तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. चाकण येथील निबे कंपनीच्या वर्धपान दिन तसेच मिसाइल काॅम्प्लेक्स, स्माॅल आर्म्स उत्पादन सुविधेच्या शुभारंभप्रसंगी कार्यक्रमात बाेलत हाेते. फडणवीस म्हणाले, गणेश निबे यांच्यासारख्या तरुणाने माेठे स्वप्न पाहून स्वत:च्या कर्तृत्वावर संरक्षण सामग्री निर्मितीत नाव कमावल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल
पुणे जिल्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे. तसेच टेक्नॉलॉजीचे कॅपिटल आहे. सध्या आम्ही जगभरातील लोकांशी संवाद साधत आहोत. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App