विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना काठोरातील कठोर शिक्षा करण्यात येईल ज्यामुळे गुन्हेगारांना एक संदेश मिळेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय देशमुख यांना दिला आहे. संतोष देशमुख प्रकरणात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना माफी नाही. यामागे कुणीही असेल त्याला शिक्षा मिळेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिला आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस उपस्थित होते.CM Fadnavis
मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी देशमुख म्हणाले, आमच्याकडे काही गोष्टी आणि पुरावे होते ते मुख्यमंत्र्यांना दाखवले. त्यावर चर्चा केली. आमची भूमिका ही न्यायची आहे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. निःपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे. या मागे कोणीही असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी केली आहे. एफआयअरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्यामधील सर्वांचे सीडीआर तपासावे अशी मागणी आम्ही केली आहे.
संतोष देशमुख हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर आमदार सुरेश धस यांनी आरोप केले आहेत. त्याचसोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी वाल्मीक कराड हाच यामागे असल्याचा आरोप केला. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घुण हत्या करण्यात आली होती. पवनचक्की खंडणीप्रकरणामध्ये ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडवर खंडणी प्रकरणाशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App