विशेष प्रतिनिधी
कित्तूर: कर्नाटक राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून कित्तूर-कर्नाटक प्रदेश ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी त्यांनी हा निर्णय घेतला. सीमावाद वारंवार निर्माण होत असल्याने जुने नाव न ठेवता त्याचे नामांतर करण्यात यावे असा निर्णय घेतला गेला.
CM Basavaraj Bommai announced to rename Mumbai-Karnataka region as Kittur-Karnataka
हैदराबाद-कर्नाटक क्षेत्राचे नाव बदलून कल्याण कर्नाटक केल्यानंतर आता काही दिवसातच मुंबई कर्नाटक प्रेदेशाचे नाव बदलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कर्नाटकातील काही सीमावर्ती भाग आणि बेळगाव जिल्हा महाराष्ट्रात विलीन करण्याच्या दाव्यांसंदर्भात येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. असे नाव का देण्यात आले हे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.
PCMC 700 कोटींच्या घोटाळ्याची तक्रार करण्यासाठी खासदार बारणे दिल्लीच्या ईडी कार्यालयात दाखल
ते म्हणाले की, “कर्नाटक येथे एकिकरणानंतर सीमा विवाद सोडवले गेले. परंतु त्यानंतरही भांडण सुरू असल्याचे ऐकिवात होते. या घटना घडत असताना त्याला मुंबई-कर्नाटक म्हणण्यात अर्थ आहे का? १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायदा लागू झाल्यानंतर या क्षेत्रात बदल होणे अपेक्षित होते. केवळ प्रदेशाचे नाव न बदलता लोकांचा जीवनमान व विकास यामध्ये सुधारणा करणे आणि प्रादेशिक असमतोल आणि असमानता दूर करणेही आवश्यक आहे.” प्रादेशिक विषमता संपवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील राहील असेही त्यांनी सांगितले. तेलंगणा सीमेला असलेल्या कल्याण-कर्नाटक प्रदेशासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल व कित्तूर कर्नाटक क्षेत्र विकासासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App