चोरडियांच्या घरच्या “गुप्त” बैठकीसंबंधी विचारल्यावर काल शरद पवार चिडले, आज अजितदादा चिडले!!

प्रतिनिधी

मुंबई : पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवारांची “गुप्त” बैठक झाल्याच्या बातम्या आल्या. चोरडियांच्या घरातून अजित पवार गाडीतून झोपून बाहेर पडल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांनी केल्या. पण त्या बैठकी संदर्भात पत्रकारांनी काल बारामती शरद पवारांना विचारल्यानंतर पवार चिडले होते. आज त्याच बैठकीविषयी अजित पवारांना विचारल्यानंतर अजित पवारही चिडले. chordia house meeting Today Ajit Dada got angry

चांदणी चौकातल्या पुलाच्या उद्घाटनानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची अतुल चोरडिया यांच्या घरी “गुप्त” बैठक झाल्याच्या बातम्या परवा माध्यमातून आल्या होत्या. अजित पवारांमार्फत भाजपने शरद पवारांना केंद्रात कृषिमंत्री पदाची आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या होत्या. पण त्या बातम्या शरद पवारांनी काल बारामतीत फेटाळल्या होत्या. त्याचबरोबर “गुप्त” बैठकीसंदर्भात विचारल्याबरोबर पवार पत्रकारांवर चिडले होते. माझ्या पुतण्याची भेट मी घेऊ शकत नाही का??, असा उलटा सवाल त्यांनी केला होता.

मात्र शरद पवार अजित पवारांच्या “गुप्त” बैठकीवरून शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये रागाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी या “गुप्त” भेटीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. काका – पुतण्यांच्या गुप्त भेटीतून महाविकास आघाडीत अयोग्य संदेश जातो. पवारांनी असल्या भेटी टाळल्या पाहिजेत, असे परखड मत नाना पटोले, उद्धव ठाकरेंचा सामना आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले आहे.



या पार्श्वभूमीवर बारामतीत पत्रकारांनी शरद पवारांना काल हाच नेमका प्रश्न विचारल्यानंतर ते चिडले आणि यात संभ्रम काय तो प्रसारमाध्यमांनीच घडवलाय. त्यांना उद्योग नाही, असे ते म्हणाले.

या “गुप्त” बैठकीवरून अजित पवारांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ते देखील चिडले. मूळात ती “गुप्त” बैठक नव्हती. चोरडियांचे पवार परिवाराशी दोन पिढ्यांचे संबंध आहेत. अतुल चोरडिया यांचे वडील आणि शरद पवार हे वर्गमित्र. त्यामुळे अतुल चोरडियांनी आम्हाला जेवायला बोलावले होते. शरद पवारांबरोबर त्यावेळी जयंत पाटील होते वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मधला कार्यक्रम आटोपून शरद पवार तिथे पोहोचले आणि मी चांदणी चौकातला कार्यक्रम आटोपून तिथे पोहोचलो. या बैठकीत मूळात “गुप्त” काही नव्हते. त्यातून वेगवेगळे अर्थ फक्त प्रसारमाध्यमांनीच काढले, अशा शब्दांत अजित पवारांनी पत्रकारांना फटकारले.

अजित पवार “गुप्त” बैठक आटोपून बाहेर पडत असताना त्यांची गाडी अतुल चोरडियांच्या बंगल्याच्या गेटला धडकली. अजित पवार गाडीतून झोपून गेले, अशा बातम्या मराठी माध्यमांनी त्यावेळी केल्या होत्या. त्या बातम्यांवरही अजित पवार चिडले. मी उघडपणे फिरणारा कार्यकर्ता आहे. मी कशाला लपून कुठे जाईन??, जी गाडी गेटला धडकली, त्या गाडीत मी नव्हतोच. तुम्हाला कोणी सांगितले मी त्या गाडीत होतो??, असे संतप्त उद्गारही अजित पवारांनी काढले.

मात्र, अतुल चोरडिया यांच्या घरची “गुप्त” असलेली किंवा नसलेली भेट झाल्यानंतर 24 तासांनी पवारांनी खुलासा केला आणि 48 तासांनी अजित पवारांनी खुलासा केला. ही वस्तुस्थिती त्यामुळे लपत नाही.

chordia house meeting Today Ajit Dada got angry

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात